Mumbai Metro Line 
मुंबई/पुणे

Mumbai Metro: मुंबई मेट्रोचा 337 किमीपर्यंत विस्तार होणार; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला भविष्यातील मास्टर प्लॅन

Mumbai Metro Line: मेट्रोमुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. भविष्यात मेट्रोचं जाळं वाढवलं जाणार आहे.

Bharat Jadhav

  • महिलांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार

  • नागरिकांना वेळेत कामावर पोहोचणे शक्य होणार

  • रस्त्यांवरील वाहतूक 20 ते 30 टक्क्यांनी कमी होणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला आणि महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रखडलेला मेट्रो मार्गिका-9 (दहिसर–काशीगाव) प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. या मार्गिकेच्या लोकार्पणामुळे मुंबई आणि एमएमआरमधील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळाली असून लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मेट्रो मार्गिका-९ लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, दहिसर ते काशीगाव दरम्यान 4.4 किमी लांबीचा पहिला टप्पा सुरू झाल्याने मीरा-भाईंदर आणि काशीगाव परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील 4.3 किमीचा टप्पा सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत असून त्याचे सुमारे 96 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि तोही याच वर्षात सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि एमएमआर जोडण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मार्गिकेमुळे दहिसर स्थानकावरून मेट्रो-२ए आणि मेट्रो-1शी जोडणी मिळणार असून भविष्यात मेट्रो-7 , 7ए आणि मेट्रो-३द्वारे कुलाबा तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. परिणामी काशीगाव ते कुलाबा असा अखंड आणि जलद प्रवास शक्य होणार आहे.

याशिवाय वडाळा–गायमुख–भाईंदर या नव्या मेट्रो मार्गाच्या कामालाही सुरुवात झाली असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि एमएमआरमध्ये एक सुसंगत ‘लूप’ तयार होणार आहे. त्यामुळे कल्याण, नवी मुंबई, तळोजा यांसारख्या भागांनाही प्रभावी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मुंबईतील मेट्रो नेटवर्क सध्या सुमारे 100 किमीपर्यंत पोहोचले असून ते भविष्यात 337 किमीपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे. हे जाळे पूर्ण झाल्यानंतर मुंबईचा मेट्रो प्रकल्प जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळवेल, असेही त्यांनी सांगितले.मेट्रोमुळे रस्त्यांवरील वाहतूक 20 ते 30 टक्क्यांनी कमी होणार असून पेट्रोलची बचत, प्रदूषणात घट आणि वेळेची बचत होणार आहे. नागरिकांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Cleaning : दिवाळीच्या साफसफाईची योग्य सुरुवात, आधी घरातून बाहेर काढा या अनावश्यक वस्तू

Ghee Benefits : रात्री पायाला तूप लावल्याने काय फायदा होतो? मालिश करण्याची योग्य पद्धत काय?

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत मिळणार : एकनाथ शिंदे

Supreme Court: मुलांनाही इंटरनेट वापरण्याचा मूलभूत अधिकार, बंदी घालता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Skin Care: क्लिन आणि ग्लोईंग स्किनसाठी पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट कशाला, घरीच वापरा 'हा' फेसपॅक

SCROLL FOR NEXT