Mumbai News : मुंबईतील एअर इंडियाची (Air India) इमारत राज्य शासनाला मिळावी यासाठी हालचालींना आता वेग आलेला आहे. एअर इंडियाची गंगनचुंबी इमारत खरेदी करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) उद्या दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
या बैठकित राज्याचे मुख्य सचिवांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्ली दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय विमान नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे एअर इंडिया इमारत खरेदीबाबत चर्चा केली होती.
सध्या मंत्रालय आणि अॅनेक्स इमारत मिळून सुद्धा शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडते, त्यामुळे मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला देण्याची विनंती फडणवीस यांनी केली.
केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारला प्राधान्य देण्याची मागणी मान्य केली आहे. आता केंद्र सरकारचे अधिकारी आणि आमचे मुख्य सचिव यासंदर्भात पुढील चर्चा करतील आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मान्यतेने पुढील निर्णय घेण्यात येईल", असं फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.
२०१८मध्ये फडणवीस सरकार एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यास इच्छुक होते. महाराष्ट्राच्या प्रशासनाचे सर्व विभाग एकाच इमारतीत आणण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. सर्व कार्यालयं या एकाच इमारतीत हलवली तर कारभारात अधिक पारदर्शकता येईल, तसेच कारभार अधिक गतिमान होईल असे राज्य सरकारला वाटते, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले व महाविकास आघाडीचे सरकार आले. ठाकरे सरकारने त्या काळात १४०० कोटी रुपये या इमातीची बोली लावली होती. एअर इंडियाची ही टोलेजंग इमारत २३ मजली आहे. कंपनीने १९७४ मध्ये ही इमारत बांधली.
२०१३ पर्यंत एअर इंडियाचे मुख्यालय याच इमारतीत होते. पण त्यानंतर ते दिल्लीला हलविण्यात आले. त्याचदरम्यान कंपनीचा तोटाही वाढला. यामुळे २०१४मध्ये मोदी सरकार सत्तेवर येताच त्यांनी ही इमारत विकण्याचा निर्णय घेतला. या इमारतीतील तळ मजला व २२ वा माळा एअर इंडियाने स्वत:च्या ताब्यात ठेवला. चार माळे वगळता उर्वरित माळे भाडेपट्टीवर दिले आहेत. याआधी जेएनपीटीने १३७५ व एलआयसीने १२०० कोटी रुपये देऊ केले होते. राज्य सरकार त्याहून अधिक देण्यास तयार आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.