Beed Crime : संतापजनक! परळीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार...!

काळजाचा थरकाप उडवणारी घटना
crime News
crime NewsSaam Tv

Beed Crime News : बीडच्या परळी तालुक्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पळवून नेत अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या (Beed) सिरसाळा पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलीय. प्रमोद सलगर रा. मुंगी ता. धारुर जि. बीड असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.  या संतापजनक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Beed Crime News In Marathi)

crime News
Mumbai News : मुंबईकरांना महागाईचा झटका! सीएनजी-पीएनजी दरात मोठी वाढ

या विषयी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून, 13 वर्षीय पीडिता ही आजी आजोबांच्या घरी होती. दि. 22 ऑक्टोबर रोजी आजी आजोबाच्या राहत्या घरातून, आरोपी प्रमोद सलगर याने पीडितेला पळवुन नेले. सदरील फिर्यादीवरून आरोपीविरोधात कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान घटनेतील पीडितेने दिलेल्या जबाबात म्हटलंय की, प्रमोद याने माझ्यावर अनेकदा अत्याचार केला. या सोबतच कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पीडितेच्या सदर जबाबावरुन बीडच्या सिरसाळा पोलिसांकडून आरोपी प्रमोदच्या मुसक्या आवळल्या असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com