CM Uddhav Thackeray Latest News
CM Uddhav Thackeray Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! औरंगाबादच्या 'संभाजीनगर' आणि उस्मानाबादच्या 'धाराशिव' नामांतराला कॅबिनेटची मंजुरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने आज, मंगळवारी मोठे निर्णय घेतले आहेत. औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. सोबतच उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. आज २९ जून २०२२ ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार (MVA) आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे. उद्या, ३० जुलैला मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. अशात राज्य सरकारकडून सरकार कोसळण्यापुर्वी निर्णयांचा सपाटा लावण्यात आला आहे. औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. सोबतच उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. (Aurangabad Osmanabad Rename News)

हे देखील पाहा -

आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

• औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता.

(सामान्य प्रशासन विभाग)

• उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.

(नगर विकास विभाग)

• राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)

• कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार

(विधि व न्याय विभाग)

• अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार

(परिवहन विभाग)

• ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.

(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

• विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.

(नियोजन विभाग)

• निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

( सामान्य प्रशासन विभाग)

• शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.

(महसूल विभाग)

(Maharashtra Cabinet clears proposal to rename Aurangabad as Sambhajinagar, Osmanabad as Dharashiv)

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai international Airport) दि. बा. पाटील यांचे नाव देणार असल्याचाही निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नवी मुंबई येथील भूमिपुत्रांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) हे आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात औरंगाबाद की संभाजीनगर यावरून गेल्या तीस वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रित आहे. शिवसेनेच्या (Shivsena) वतीने संभाजीनगरची हाक दिल्यानंतर पण सत्तेत आल्यानंतर संभाजीनगर नामकरण करणार असं आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचेही दिसून आले. मात्र, आता राज्य सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT