भाजपा आमदारांचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला saam tv news
मुंबई/पुणे

भाजपा आमदारांचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला

या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी आता या भागांना राज्यासह देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने (Monsoon) कोकण (kokan) आणि पश्चिम महाराष्ट्राला (West maharashtra) महापुराचा (Flood ) तडाखा बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural disasters) या भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी (Loss of life) आणि वित्तहानी (Financial loss) झाली आहे. अनेकांनी आपली जीवाभावाची माणसे गामावली आहेत तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी आता या भागांना राज्यासह देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या पार्श्वभुमीवर भाजपा आमदारांनी (BJP MLA) आता आपला एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली आहे. (Salary of BJP MLAs to Chief Minister's Assistance Fund for flood victims)

राज्यात निर्माण झालेली पुर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान झाले आहे. यासाठी भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil ) यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला आहे.

त्यानुसार भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांनांंचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पुरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करीत आहोत.

दरम्यान, महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींच्या मदतीची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी काल लोकसभेत केली. अतिवृष्टी आणि महापुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा केंद्र सरकारला एक सखोल अहवाल मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातीस पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत जाहीर करण्यात येत आहे. अशी घोषणा नरेंद्र सिंह तोमर यांनी केली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT