मुंबई : राज्यामधील state उद्योजकता वाढविण्याकरिता भर देण्याचे मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यालाच सक्रिय कोरोना Corona रुग्ण दर एकपेक्षा कमी असलेल्या १४ जिल्ह्यांत districts निर्बंध Restrictions शिथील करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले आहे. २ दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णदर १ किंवा त्यापेक्षा कमी असेल त्याठिकाणी कोरोना विषयक निर्बंध कमी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केले जाणार आहे, असे सांगितले आहे.
यानुसार आरोग्य विभागाने निर्बंध शिथिलतेबाबत प्रस्ताव सादर केले आहेत. राज्यामधील ३५ जिल्ह्यांपैकी १४ जिल्ह्यांमध्ये ३ आठवड्यांपेक्षा जास्त सक्रिय रुग्णदर १ किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यांची यादी तयार केली आहे. याठिकाणी उद्योग- व्यापाराला पोषक वातावरण निर्माण करण्याकरिता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. एकीकडे पूरग्रस्त कोल्हापूर Kolhapur, सातारा, सांगली Sangali यासारख्या जिल्ह्यामध्ये सक्रिय रुग्णसंख्या वाढण्याची भीती आरोग्य विभागाला वाटत आहे.
हे देखील पहा-
अशा जिल्ह्यांत कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कोणत्या पद्धतीने करता येईल याचा आढावा आरोग्य विभाग Health Department करत आहे. जुलै १८ ते २४ या दिवसाच्या कालावधी मध्ये सांगली मधील सक्रिय कोरोना रुग्ण दर ९.१ इतका आहे. त्याच्या पाठोपाठ सातारा ८.२, सिंधुदुर्ग ८, पुणे ७.४ , कोल्हापूर ६.३, अहमदनगर ६.२, बीड ५.८ आणि सोलापूर व रत्नागिरी अनुक्रमे रुग्णवाढ दर हा ५ टक्के आणि ४.७ टक्के इतका आहे. मुंबई मध्ये हाच दर २.३ टक्के असल्याने लोकल ट्रेन सुरु करण्याबरोबरच अन्य निर्बंध शिथील करण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सावध राहिल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
राज्याचा कोरोना रुग्णवाढ दर हा ४.५ टक्के एवढा आहे. कोरोनाच्या किमान निर्बंधांचे पालन केल्यास रुग्णवाढ ही आटोक्यात ठेवता येणार आहे, असे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी यावेळी सांगितले आहे. राज्यामध्ये ४ कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झालेले आहे. १ कोटीहून अधिक लोकांनी लसीच्या दोन्ही डोस घेतलेले आहेत. राज्यात कोरोना डॉक्टर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. मुंबई मध्ये ७० टक्के लोकांचे लसीकरण पूर्णतः झाल्याशिवाय लोकल ट्रेनचा प्रवास सर्वांकरिता खुला करण्यास मुख्यमंत्री अनुकूल नसल्याच म्हणणे आहे.
जूनमध्ये राज्य आणि केंद्राकडून १.१५ कोरोना लसीच्या मात्रा मिळाले होते, तर ऑगस्ट महिन्याकरिता केंद्र सरकारने १.२ कोटी लस मात्रा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राज्यात सध्या ४ हजारहून अधिक केंद्रांमधून लस दिली जाणार आहे. दिवसाला १२ लाख लोकांचे लसीकरण करण्याची आपली क्षमता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले आहे. राज्यात लसीच्या पुरेशा मात्रा मिळाल्यावर नियोजित वेळेअगोदर कमी वेळात आम्ही लसीकरण पूर्ण करू शकणार आहेत, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी देखील केंद्रीय आरोग्य सचिवांना जुलैमध्ये पत्र पाठवून दीड कोटी अतिरिक्त लसीच्या मात्रा देण्याची विनंती केलेली होती. मात्र, केंद्राने ऑगस्ट महिन्याकरिता १ कोटी २० हजार लस मात्र देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर ३ लाटेचा विचार करून, १४ जिल्ह्यांकरिता कोरोना विषयक निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.