Shinde Sena Versova unit chief Altaf Pevekar after filing his independent nomination, triggering political turmoil. saam tv
मुंबई/पुणे

Corporation Election: 'पक्षात काम करून काय फायदा? ठाण्यानंतर वर्सोव्यात शिंदे सेनेला मोठा धक्का; निष्ठावंतानेच पुकारलं बंड

Mumbai Corporation Election: विधानसभा युनिट प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे वर्सोव्यात शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. पेवेकर यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जात बंडखोरी केली आहे.

Bharat Jadhav

  • ठाकरे गटनंतर आता शिंदे गटातही वर्सोव्यात बंडखोरी

  • अल्ताफ पेवेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला

  • भाजपला जागा दिल्याने स्थानिक शिवसैनिक नाराज

मुंबईतील वर्सोवामधील राजकारणाचा पारा चांगलाच तापलाय. ठाकरे गटानंतर आता शिंदे गटातही येथे बंडखोरी झाली आहे. शिंदे गटाचे वर्सोवा विधानसभा विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार आणि शिवसेनेचं टेन्शन वाढलंय.

अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पक्षाच्या निर्णयावर टीका केली. स्थानिकांची अपेक्षा डावलवत शिंवसेनेची जागा भाजपला देण्यात आली. त्यामुळे पक्षात इतकी वर्ष काम करून काय उपयोग असा सवालही पेवेकर यांनी केलाय.

अल्ताफ वॉर्ड क्रमांक ५९ मधून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र हा वॉर्ड भाजपाकडे गेल्याने ते नाराज झाले. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. “इतकी वर्षे काम करूनही सीट मिळत नसेल, तर त्या पक्षात काम करून काय फायदा?” असा सवाल अल्ताफ पेवेकर यांनी यावेळी केला. पेवेकरांमुळे वॉर्ड ५९ भाजपला दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटातील असंतोष आता उघडपणे समोर आलीय.

इतकी वर्षे काम करूनही सीट मिळत नसेल, तर...

शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते असतानाही बंडखोरी का केली असा सवाल केल्यानंतर अल्ताफ पेवेकर म्हणाले, हा ५९ वार्ड शिवसेनेचा वॉर्ड आहे. तेथे मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वायकर यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाचं काम खूप केलंय. ही जागा शिवसेनेच्या हक्काची आहे. आणि शिवसैनिक आपल्या हक्कासाठी पेटवून उठत असतो. येथील लोकांना स्थानिक उमेदवार हवा होता. विरोधीपक्षानेही येथे बाहेरील उपऱ्या उमेदवार दिलाय. येथील लोकांना हे मान्य नाहीये.

ठाकरे गटातही बंडखोरी

दरम्यान आज अनेक ठिकाणी नाराज उमेदवारांचा राडा पाहायला मिळाला. शिवसेनेसह भाजप आणि ठाकरे गटात बंडखोरी झाली आहे. वर्सोवा प्रभाग क्रमांक ५९ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात मोठी बंडखोरी झाली. येथे शैलेश फणसे यांना उमेदवारी जाहीर होताच स्थानिक इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.

या नाराजीचे रूपांतर थेट बंडात झाले. इच्छुक उमेदवार सचिन शिवेकर यांनी हजारो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरत ताकद दाखवली. “प्रभाग आणि विधानसभेच्या बाहेरचा उमेदवार लादण्यात आला” असा आरोप करत स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उघडपणे पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान बाहेरच्या’ उमेदवारामुळे मतदारांमध्ये अस्वस्थता वाढली असून, केवळ ठाकरे गटच नव्हे तर भाजपानेही बाहेरचा उमेदवार दिल्याने सर्वच प्रमुख पक्षांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

4 टर्म भाजप नगरसेवक,यंदा तिकीट कापलं; ऐनवेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी, अकोल्यात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात बारा पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार

Pune Corporation Election: पुण्यातील भाजप शिवसेना युतीची "इनसाईड स्टोरी''; भाजपला प्रस्तावात दिलेल्या जागांची यादी "साम" वर

New Year 2026 Wishes Marathi : नववर्षाच्या शुभेच्छांनी आणखी गोड होईल तुमचा दिवस! Status, Story साठी खास मेसेज

१० वर्षांपूर्वी फार्म हाऊसवर कसे पकडले गेले? तिकीट कापल्यानंतर इच्छुक उमेदवाराचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT