Marathi Falak News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत मराठीच चालणार! मालाडमधील बस स्थानकावरील गुजराती भाषेतील फलकाला फासले काळे

Marathi VS Gujrati Nameplates Clashes: मुंबईत मराठीच चालणार! मालाडमधील बस स्थानकावरील गुजराती भाषेतील फलकाला फासले काळे

Satish Kengar

>> संजय गडदे

Marathi Falak News:

मुंबईत सध्या मराठी आणि गुजराती भाषिक वाद चांगलाच पेटला असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईच्या घाटकोपर परिसरातील 'मारू घाटकोपर' नावाचा बोर्ड शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडण्यात आला.

नंतर त्या ठिकाणी माझे घाटकोपर अशा नावाचा फलक लावण्यात आला. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जागृती केंद्र प्रवासी बस स्थानकावर गुजराती भाषेत असलेल्या फलकावर देखील मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला.

तसेच आज मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून त्या बसस्थानकावर असलेल्या गुजराती भाषेतील फलकाला काळे फासण्यात आले. महाराष्ट्रात मराठी हीच भाषा प्रामुख्याने वापरली गेली पाहिजे. (Latest Marathi News)

जिथे जिथे इतर भाषा लादल्या जातील, त्या सर्वच ठिकाणी लवकरच मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन पुकारले जातील. इतर भाषेतील फलक काढून टाकण्याचं काम केले जाईल, असा इशारा मराठी एकीकरण समितीकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, याआधी घाटकोपर येथे 'मारु घाटकोपर' असं गुजराती भाषेतील फलक लागलं होत. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे फलक तोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT