Deputy CM Ajit Pawar Statement Saam Tv
मुंबई/पुणे

Deputy CM Ajit Pawar Statement: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारसोबत का गेले?, स्वत:च सांगितलं यामागचं खरं कारण

Ajit Pawar On Pm Modi And Amit Shah: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केलं आहे.

Priya More

Amit Shah Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) आज पुणे दौऱ्यावर आहेत. केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड येथील मोरे सभागृहामध्ये हा कार्यक्रम सुरु आहे.

या कार्यक्रमामध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा का दिला यामागचं देखील कारण सांगितलं आहे.

अजित पवार यांनी सांगितले की, 'जे चांगलं आहे ते चांगले आहे. काही लोकांना प्रश्न पडतो अजित पवार यांनी असा निर्णय का घेतला? त्याचं कारण हेच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघे देशाचे नेतृत्व करू शकतात. म्हणून मला वाटले की त्यांच्या पाठी उभे राहिलेच पाहिजे.' असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्यामागचं कारण सांगितलं.

'पीएम मोदी आणि अमित शाह दोघे कधीच सुट्टी घेत नाहीत. पंतप्रधान सुट्टी घेत नाहीत हे आत्तापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. देशाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही.', असं देखील त्यांनी सांगितलं. तसंच, यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलताना असे सांगितले की, 'अमित शाह महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यामुळं त्यांचं महाराष्ट्रावर अधिकचं प्रेम आहे. अमितभाई हे गुजरातचे आहेत. पण त्याचं महाराष्ट्रावर अधिकचं प्रेम आहे. प्रत्येक जावयाचे सासुरवाडीवर विशेष प्रेम असतं. हे अमित भाईंच्या रूपाने पाहायला मिळतं.'

अजित पवारांनी पुढे सांगितले की, 'महाराष्ट्र आणि गुजरात काही वर्षांपूर्वी एक होतं. दोन्ही राज्यात ही सहकारातून क्रांती झालेली आहे. केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही २२ वर्ष प्रयत्न करत होतो. कोणी ही डेअरिंग केली नाही. ही डेअरिंग फक्त अमित भाईंनी दाखवलं. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे.' असं म्हणत अजित पवारांनी अमित शहांचं कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोर धडक; तरुणाचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT