Gyanvapi ASI Survey: उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) वाराणसी येथील ज्ञानवापी (Gyanvapi ASI Survey) परिसरात सर्वेक्षण सुरु आहे. सर्वेक्षणाचा आज तिसरा दिवस आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. हे सर्वेक्षण सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ज्ञानवापीच्या परिसरात हिंदू धर्माची चिन्हे गोळा करत आहेत.
पहिल्या आणि दुसऱ्या दिवसांच्या सर्वेक्षणात एएसआयच्या टीमने हिंदू धर्माची चिन्हे गोळा करून एका ठिकाणी जमा करुन ठेवली आहेत. या सर्वेक्षणात जीपीआर तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 51 सदस्यीय एएसआय टीमकडून ज्ञानवापीचे सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणात 16 लोकांना सहभागी होण्याची परवानगी आहे. त्यापैकी 9 मुस्लिम पक्षाचे आणि 7 हिंदू पक्षाचे सदस्य आहेत.
5 ऑगस्ट रोजी सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी एएसआयने ज्ञानवापी परिसरामध्ये वैज्ञानिक सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालले. हिंदू पक्षाच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, एएसआय टीमने दुसऱ्या दिवशी मशीद परिसराच्या मध्यवर्ती घुमटाच्या हॉलचे सर्वेक्षण केले आणि त्या जागेचे फोटोग्राफी आणि मॅपिंग केले. यासोबतच व्यास कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या तळघराचेही सर्वेक्षण करण्यात आले.
व्यास कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या तळघराच्या सर्वेक्षणाबाबत माहिती समोर आली आहे. हिंदू पक्षाने दावा केला आहे की, याठिकाणी 4 फुटांची मूर्ती सापडली आहे. मूर्तीवर काही कलाकृती आहेत. मूर्तीशिवाय 2 फुटांचे त्रिशूल आणि 5 कलशही सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तळघराच्या भिंतींवर कमळाच्या खुणा आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंदू पक्षाचे म्हणणे आहे की, सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानवापी संकुलाच्या पश्चिमेकडील भिंतीवर अर्धे प्राणी आणि अर्धे देवता यांची मूर्ती दिसली. तळघरात तुटलेल्या मूर्ती आणि खांबही दिसलेत.
4 ऑगस्ट रोजी शुक्रवारच्या नमाजमुळे केवळ 5 तासच सर्वेक्षण करण्यात आले. सकाळी 7 वाजता सुरू झालेले सर्वेक्षण दुपारी 12 वाजता बंद करण्यात आले होते. पहिल्या दिवसाच्या सर्वेक्षणात बहुतांश पेपर वर्क झाले. या दिवशी टीमने संपूर्ण परीसराचे डिझाईन तयार केले आणि भिंती आणि आजूबाजूच्या परिसरातून पुरावे गोळा केले. आवारात उपस्थित असलेल्या तळघर आणि तीन घुमटाखालील सर्वेक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला. हिंदू स्मरणिकेचे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करण्यात आली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.