Manipur News: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली आहे . या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर काही भागात घरांचीही जाळपोळ झाली. (Latest Marathi News)
मणिपूरमधील बिष्णुपुरातील क्वाक्टा भागात सुरक्षा दल आणि एका गटादरम्यान गोळीबार झाला. एका रिपोर्टनुसार, गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. तर एका गटाने घरांची जाळपोळ देखील केली.
बिष्णुपूर जिल्ह्यात झाला हिंसाचार
हिंसाचाराची घटना घडल्यानंतर बिष्णुपूर जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या भागात तैनात असलेल्या काही जखमी कमांडो जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वीही झाली होती हिंसा
मणिपूरच्या बिष्णुपूरमध्ये दोन दिवसांपूर्वीही हिंसाचारासाठी घटना घडली होती. गुरुवारी या भागात गोळीबार झाला. सुरक्षा दल आणि एका गटामध्ये हा गोळीबार झाला. या घटनेत १७ जण जखमी झाले होते.
या जिल्ह्यात हिंसाचार उफाळल्यानंतर सुरक्षा दल आणि मणिपूर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या. काही आंदोलनकर्त्या महिला बॅरिकेड क्षेत्र भेदून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यावेळी आसाम रायफल्स आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ) ने त्यांना रोखलं. यावेळी आंदोलनकर्ते आणि सशस्त्र दलामध्ये दगडफेक झाली.
दरम्यान, मणिपूर हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी काही ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील काही भागातून हिंसक जमावाने शस्त्रे आणि दारुगोळा लुटला आहे.
मणिपुरात जमावाकडून सतत जाळपोळ आणि हल्ल्यांच्या घटना घडतच आहेत. या घटनांमुळे काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद करण्यात आल्या आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका,असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.