Earthquake in Delhi: दिल्लीत भूकंपाचे तीव्र झटके; रिश्टर स्केलवर ५.८ तीव्रतेची नोंद

Maharashtra Breaking Marathi News Live Updates: आज दिनांक महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी.... राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. जळगाव जिल्ह्यातील चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक. आरोपीला फाशी देण्याची मागणी.
maharashtra breaking news today 5th august 2023 latest marathi news Maharashtra Rain Updates Maharashtra Political News Updates
maharashtra breaking news today 5th august 2023 latest marathi news Maharashtra Rain Updates Maharashtra Political News Updates Saam TV
Published On

दिल्लीत भूकंपाचे तीव्र झटके; रिश्टर स्केलवर ५.८ तीव्रतेची नोंद

देशाची राजधानी दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. दिल्लीत भूकंपाची तीव्रता ५.८ इतकी जाणवली. तसेच जम्मू कश्मीरमध्येही भूंकपाचे धक्के जाणवेले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा अफगणिस्तानात होता असे सांगण्यात येत आहे.

मावळ तालुक्यातील तीन रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; उद्या पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार उद्घाटन

मावळ तालुक्यातील तीन रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट होणार आहे. देशातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अमृतभारत स्टेशन योजना हाती घेतली आहे. या योजने अंतर्गत देशातील रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील देहूरोड, लोणावळा, आणि तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनचा समावेश असून यापैकी तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनचा पहिला टप्प्यात समावेश झाला आहे.

या पहिल्या टप्प्यातील 508 रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे होणार आहे. त्याच कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी घेतला आहे .

ठरलं! शरद पवार आता बीडमधील मैदानात उतरणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची १७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा आहे. आजच्या बैठकीत चर्चा झाली. आपण लढायचे असे, शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. येवल्यानंतर बीडमध्ये शरद पवार मैदानात उतरणार आहे. या सभेची संदीप क्षीरसागर यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

पुण्यातील ३ दहशतवाद्यांच्या अटकेनंतर मुंबईतून आणखी एकाला अटक

पुण्यातून ३ दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एनआयएकडून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. भिवंडीमधील पडघा येथून अकिब आतिक नाचण नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अकिब दहशतवादी असल्याचा संशय पोलिसांना असून पहाटे पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली आणि त्याला ताब्यत घेतलं आहे.

मुंबईत मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईतून एक मोठी बातमी समोर येतेय. मुंबईतील पूर्व दृतगती महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कांजूरमार्ग विभागात बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कांजूरमार्ग ते मुलुंड पर्यंत वाहतूक कोंडी झाली असून जवळपास 3 ते 5 किलोमीटर च्या वाहनांच्या रांगा लागल्याची माहिती आहे.

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ पुण्यात मोर्चा; पोलिसांनी परवानगी नाकारली

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संभाजील भिडेंच्या समर्थनार्थ आज पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त पोलिसांनी भीडेंच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय, पाटबंधारे विभागात तरुणांना मिळाल्या नोकऱ्या

मावळ मधील पवना धरण ग्रस्तांना अखेर न्याय मिळाला आहे. पंचावन्न वर्षांपूर्वी पवना धरणाच्या प्रकल्पासाठी एकोणीस गावातील 2394 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले होते. या प्रकल्पामुळे 1203 शेतकरी बाधित झाले. त्यापैकी 340 प्रकल्पग्रस्तांना मावळ व खेड या भागात जमिनीचे वाटप करण्यात आले.

उर्वरित 863 प्रकल्पग्रस्त व दोनशे ज्यांचे अजूनही संकलित यादीत नावे नाही, असे एकूण 1063 खातेदारांना अद्याप जमिनीचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यांना जमीन मिळावी या व इतर मागणीसाठी धरणग्रस्त गेल्या पंचावन्न वर्षांपासून लढा देत होते.

पवन मावळातील शेतकरी न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र आता या शेतकऱ्यांच्या तिसऱ्या पिढीला अखेर न्याय मिळाला असून धरणग्रस्तांच्या तब्बल एकोणीस कुटुंबातील मुलांना सरकारी नोकरीत रुजू करण्यात आले आहे.

त्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे तसेच मावळ आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश आलंय. या शेतकरी तरुणांना पवना पाटबंधारे विभागात सुरक्षा रक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उशिरा का होईना न्याय मिळवून सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद या तरुणांनी एकमेकांना पेढे भरवत साजरा केला.

आज शरद पवार गटाची महत्वाची बैठक...

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजितदादांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारणातील समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून पक्ष बांधणीसाठी हालचाली सुरू असून आज शरद पवार यांनी वाय. बी चव्हाण सेंटरवर महत्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी एक वाजता ही बैठक होणार असून शरद पवार यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्याबद्दल रणनिती आखली जाण्याची शक्यता आहे...

शेतात काम करणाऱ्या मजुरांवर मधमाश्यांचा हल्ला; दोघांचा मृत्यू, 5 जखमी

गोंदिया जिल्ह्यातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. कुऱ्हाडी येथे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला.

याशिवाय ५ शेतमजूर जखमी झाले आहेत. सुमन आनंदराव आमडे व लक्ष्मीचंद पुरनलाल पटले (६५) असे मृतांचे नाव आहेत. मधमाशांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Maharashtra Breaking News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात होत असलेल्या 122 व्या दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एका ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जातेय. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये तीन जवान शहीद झाले आहेत. लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com