Eknath Shinde on Uddhav Thackeray Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde on Uddhav Thackeray : 'तीन वर्षांपूर्वी धो डाला, उठेगा नही साला', हा डायलॉग त्यांनाच शोभून दिसतो. मी नाही बोलत. तीन वर्षांपूर्वी उठाव केला, अन्यायाविरुद्ध उठलो. दाढीवरून अर्धाच हात फिरवला ते आडवे झाले, अजून सावरले नाहीत'.

Prashant Patil

मुंबई : 'उद्धव आणि मी २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं', अशी टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. तर 'बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर आज भेट झाली. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षदा टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी', असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'तीन वर्षांपूर्वी धो डाला, उठेगा नही साला', हा डायलॉग त्यांनाच शोभून दिसतो. मी नाही बोलत. तीन वर्षांपूर्वी उठाव केला, अन्यायाविरुद्ध उठलो. दाढीवरून अर्धाच हात फिरवला ते आडवे झाले, अजून सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून सावरण्याचा प्रयत्न करताय', असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

'उठेगा नही साला', हे त्यांना शोभत नाही. त्याला मनगटात जोर लागतो. तोंडाच्या वाफा सोडून होत नाही. एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली. आणि दुसऱ्याने सत्तेसाठी खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही अजेंडा नाही असं म्हणत होते. पण एका वक्त्याने पथ्य पाळले. दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा, सत्तेचा अजेंडा निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला', असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला जेव्हा मी मुख्यमंत्री होतो. पंतप्रधान मोदींनी त्यावर तात्काळ होकार दिला. ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यांनाही तुम्ही सोडलं नाही. आजचा मेळावा होता तो मराठी माणसासाठी, भाषेसाठी, पण त्यांच्या भाषणात आगपाखड होती. द्वेष, जळजळ आणि मळमळ दिसून आली. मराठीसाठी आम्ही काय केलं? त्यांनी काय केलं? मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला? याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं', असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

SCROLL FOR NEXT