Maharashtra Corona Update
Maharashtra Corona Update Saam Tv
मुंबई/पुणे

Corona In Maharashtra: महाराष्ट्राभोवतीचा कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, २४ तासांत चित्र पालटले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत आहेत. आजच्या आकडेवारीने राज्याचे पुन्हा टेन्शन वाढवले आहे. आज दिवसभरात राज्यात ४०२४ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४०२४ नवे रुग्ण सापडले आहेत. तर आज ३०२८ रुग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात कोरोनामुळे (Corona) दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.सध्या राज्यात १९,२६१ रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबई विभाग - मुंबई महापालिका क्षेत्र, ठाणे, ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, मिरा भाईंदर महापालिका, पालघर, वसई-विरार महापालिका, रायगड, पनवेल महापालिका या परिसरात ३५२८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद

नाशिक विभाग - नाशिक, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, अहमदनगर, अहमदनगर महापालिका, धुळे, धुळे महापालिका, जळगाव, जळगाव महापालिका, नंदुरबार आदी परिसरात कोरोनाचे ३० नवीन रुग्ण आढळले.

पुणे विभाग - पुणे महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर, सोलापूर महापालिका, सातारा आदी क्षेत्रांत ३२९ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

कोल्हापूर विभाग - कोल्हापूर, कोल्हापूर महापालिका, सांगली, सांगली महापालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या क्षेत्रात २३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.

औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, औरंगाबाद महापालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महापालिका या भागांत ११ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

लातूर विभाग - लातूर, लातूर महापालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महापालिका या भागात १३ नवीन कोविड १९ चा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत.

अकोला विभाग - अकोला, अकोला महापालिका, अमरावती, अमरावती महापालिका, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या परिसरात १४ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली.

नागपूर विभाग - नागपूर, नागपूर महापालिका, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर महापालिका, गडचिरोली आदी भागात ७६ नवीन कोरोनाबाधित आढळले.

राज्यात ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटचे आणखी ४ रुग्ण

महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंट BA.5 बाधित आणखी चार रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या या सर्व महिला रुग्ण आहेत. त्यांचे वय साधारण १९ ते ३६ आहे. त्या सर्व महिला रुग्ण मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि ठाण्यातील आहेत. २६ मे ते ९ जून २०२२ या दरम्यान या सर्व रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर होती, अशीही माहिती देण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT