Maharashtra Latest Corona Update Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Corona: धोक्याची घंटा! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांत दुपटीने वाढ

गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात कोरोनाच्या (Corona) रुग्णांत लक्षणीय वाढ होत आहे. आज राज्यात २७०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांत घट झाली होती. काल राज्यात १८८१ रुग्णांची नोंद झाली होती, पण आज कोरोना रुग्णांनी दोन हजाराचा आकडा पार केला आहे. त्यामुळे राज्याची चिंता पुन्हा वाढली आहे. आज राज्यातील १३२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्रात ९,८०६ रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सलग तिसऱ्या दिवशीही कोविड १९ मुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यातील कोरोना (Corona) रुग्णांची एकूण संख्या ७७,४१,१४३ झाली आहे. राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढे आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ९८.००% एवढे आहे, पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेला पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोना टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Corona Latest News)

मुंबई विभाग - मुंबई महापालिका, ठाणे, ठाणे महापालिका, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका, मीरा-भाईंदर महापालिका, पालघर, वसई विरार महापालिका, रायगड, पनवेल महापालिका आदी क्षेत्रांत एकूण २४३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

नाशिक विभाग - नाशिक, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, अहमदनगर, अहमदनगर महापालिका, धुळे, धुळे महापालिका, जळगाव, जळगाव महापालिका, नंदुरबार आदी क्षेत्रांत १२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

पुणे विभाग - पुणे, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर, सोलापूर महापालिका आणि सातारा आदी भागांत २०१ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर विभाग - कोल्हापूर, कोल्हापूर महापालिका, सांगली, सांगली महापालिका, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी भागांत ८ नवे रुग्ण आढळले आहेत.

औरंगाबाद विभाग- औरंगाबाद, औरंगाबाद महापालिका, जालना, हिंगोली, परभणी, परभणी महापालिक आदी परिसरात नवे २ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

लातूर विभाग - लातूर, लातूर महापालिका, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड महापालिका आदी क्षेत्रात ७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

अकोला विभाग - अकोला, अकोला महापालिका, अमरावती, अमरावती महापालिका, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आदी क्षेत्रांत १३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर विभाग - नागपूर, नागपूर महापालिका, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर महापालिका, गडचिरोली या भागांत २० नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT