CM Devendra fadnavis PTI
मुंबई/पुणे

Oath Ceremony News : शपथविधीसाठी वाहतुकीत बदल, मुंबईती या मार्गावरील वाहतूक बंद

Maharashtra CM oath taking ceremony security: भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आझाद मैदानात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यावा कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

Saam Tv

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नव्या मंत्रिमंडळ सदस्यांचा शपथविधी सोहळा मुंबईत होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईच्या आझाद मैदानात आज, गुरुवारी (५ डिसेंबर २०२४) संध्याकाळी हा सोहळा सुरू होईल. पंतप्रधान मोदी, भाजपचे केंद्रातील ज्येष्ठ नेते, व्हीव्हीआयपी-व्हीआयपी व्यक्तींसह अगदी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाला सुरक्षा कडा उभारण्यात येणार आहे.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बुधवारीच भाजपच्या गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. उद्या शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह प्रतिष्ठित व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

कसा असेल बंदोबस्त?

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे. त्या ठिकाणी किमान पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त, १५ पोलीस उपायुक्त, २९ सहायक पोलीस आयुक्त असे सर्व वरिष्ठ अधिकारी तैनात असतील. याशिवाय, ५२० पोलीस अधिकारी, ३५०० पोलीस कॉन्स्टेबल यांचं सुरक्षा कवच असणार आहे. एका अतिरिक्त पोलीस आयुक्तांसमवेत तीन पोलीस उपायुक्त, ३० पोलीस अधिकारी, २५० पोलीस कर्मचारी हे वाहतूक नियमनाकरिता नियुक्त करण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त एसआरपीएफ, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक देखील असणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती किंवा मदतीसाठी, नागरिक १०० किंवा ११२ वर संपर्क साधून पोलिसांची मदत घेऊ शकतील.

वाहतुकीत बदल

शपथविधी सोहळ्याला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी केलं आहे. यात आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. हे बदल दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहणार आहेत. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना खासगी वाहनांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. आझाद मैदान परिसरात पार्किंग नसल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited by - Bhagyashree Kamble

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Puri Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मेथीची कुरकुरीत पुरी, सोपी आहे रेसिपी

Municipal Elections Voting Live updates : नवी मुंबई तुर्भेतील मतदारांचा संताप; संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात खराब मतदान यंत्रणा तुर्भेलाच?

Municipal Elections: अकोल्यात नुसता राडा! मतदान केंद्रावर भाजप आणि शिवसेना आमनेसामने, केंद्राबाहेर फ्री स्टाईल हाणामारी

Saam TV Exit Poll : तुमच्या महापालिकेत कुणाची सत्ता? थोड्याच वेळात पाहा महा एक्झिट पोल, EXCLUSIVE

बोगस आणि तोतया मतदारांवर थेट गुन्हा दाखल होणार! राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा कडक इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT