Maharashtra Cabinet Expansion Update: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच लवकरच खातेवाटप देखील होणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील मंत्री मंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह हे यामध्ये मध्यस्थी करणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा हा दिल्लीमध्ये सुटणार आहे. अमित शहा यामध्ये मध्यस्थी करणार आहे. भाजपकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरही शिवसेनेमुळे खातेवाटपात विलंब येत आहे. शिवसेना काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास तयार आहे. आता अमित शाह यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीची समजून काढली जाणार आहे.
मंगळवारी रात्री खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यासोबतच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नेते देखील उपस्थित होते. या बैठकीत अर्थ खाते सोडून इतर सर्व खातेवाटप निश्चित करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तिन्ही नेत्यांची सलग दोन दिवस बैठक होत आहेत. मात्र खातेवाटपावर एकमत होताना दिसत नाही. शिवसेना अर्थमंत्री पद अजित पवार यांना देण्यास उत्सुक नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना अजित पवार शिवसेना आमदारांना निधी देत नसल्याचं कारण दिलं होतं. या तिन्ही नेत्यांची चर्चेतून मार्ग निघतल नसल्याने अमित शाह मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तसंच, अर्थ खात्यासंदर्भात आज निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. झालेली चर्चा दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींना कळवली जाईल आणि तिथून होकार आल्यानंतर ताबडतोब जाहीर केले जाईल. यात काही खाती शिवसेनेची आणि काही भाजपची राष्ट्रवादीला देण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री चर्चा झाल्यानंतरही खाते वाटपाचा तिढा कायम आहे. आधी मंत्रिमंडळ विस्तार मग खातेवाटप ही शिंदे गटाची भूमिका कायम आहे. अजित पवार गटाला अपेक्षित खाती मिळत नसल्याने हा मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा विस्तार रखडला असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.