Sanjay Raut News: संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू होती, अचानक साप निघाला, उडाला एकच गोंधळ

Sanjay Raut News: राऊतांची सकाळी पत्रकार परिषद सुरू असताना घरात अचानक साप निघाला. त्यानंतर सर्वांचीच धावपळ झाली. राऊतांनाही पत्रकार परिषद थोडक्यात आटोपून घ्यावी लागली.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam tv

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात पत्रकार परिषद सुरू होती. राऊतांची सकाळी पत्रकार परिषद सुरू असताना घरात अचानक साप निघाला. त्यानंतर सर्वांचीच धावपळ झाली. राऊतांनाही पत्रकार परिषद थोडक्यात आटोपून घ्यावी लागली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांची नेहमीप्रमाणे सकाळी पत्रकार परिषद सुरू होती. त्याचवेळी अचानक त्यांच्या खुर्चीजवळ एका साप आला.

राऊतांच्या खुर्चीजवळ पाणदीवड जातीचा बिनविषारी सापा आला. साप निघाल्याने राऊतांनी पत्रकार परिषद थोडक्यात आटोपली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला पकडण्यात आले. सर्पमित्राने सापाला पकडून बॅगेत घालून नेले. त्यानंतर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित पत्रकारांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Sanjay Raut News
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray: 'कलंक' वक्तव्यावरील वादात CM एकनाथ शिंदेंची उडी; बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना सुनावले

संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला कलंक आहे, अशी टीका केली. या टीकेनंतर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. राऊतांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला.'बाण आरपार घुसला आहे. मिरच्या आरपार घुसल्या आहेत. ही मिरच्यांची धुरी आहे. ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र कलंकित केला, त्या शब्दावर बंदी आहे का? असा सवाल राऊतांनी केला.

'देवेंद्र फडणवीस यांनी सध्या लवकर मिरच्या झोंबतात. कालचा मुख्यमंत्री हा आणखी एका उपमुख्यमंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसतो, ज्या भुजबळांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्याबरोबर बसावं लागतं, असा टोला राऊतांनी लगावला.

Sanjay Raut News
Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होणार? मुख्यमंत्र्यांच्या सर्व नियोजित बैठका पुढे ढकलल्या

'झाकीर नाईक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आहे, त्याच्याकडून विखे पाटील यांच्या खात्यात पैसे गेले, त्याच्यावर काय कारवाई झाली? राहुल कुल यांचं काय झालं? दादा भुसे गिरण सहकारी साखर कारखान्यावर काय कारवाई झाली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com