Maharashtra Cabinet Expansion Saam tv
मुंबई/पुणे

Cabinet Expansion 2022: राज्याच्या पहिल्याच कॅबिनेट विस्तारात एकही महिला मंत्री नाही!

राजभवनात हा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

Maharashtra Cabinet Expansion 2022 Live मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत असला तरी, पहिल्या विस्तारात एकाही महिला नेत्याला मंत्रिपद देण्यात आले नाही. दरम्यान, राजभवनात हा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर गेल्या ४० दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नव्हता. यावरून विरोधकांकडून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

हे देखील पाहा -

राज्याचा कारभार दोनच मंत्री चालवत आहेत, अशी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होत होती. अखेर ४० दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. आज, मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दीपक केसरकर, तानाजी सावंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, उदय सामंत, राजेंद्र पाटील याड्रावकर, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती हाती आली आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्याला स्थान देण्यात आले नाही.

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात एकाही महिला नेत्याला मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे या पहिल्या विस्तारात एकही महिला मंत्री नसणार, हे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ मंत्री घेणार शपथ

राज्याच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात एकूण १८ मंत्री शपथ घेणार आहेत. शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संजय राठोड हे शपथ घेतील.

तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, विजयकुमार गवित, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण हे मंत्रिपदाची शपथ घेतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: आजच '१' पांढरा पदार्थ खाणं बंद करा; किडनी फेलचा धोका वाढतो.. तज्ज्ञ सांगतात...

Dhaba Style Chiken Curry: ढाबा स्टाईल चिकन करी घरी बनवण्याची सोपी पद्धत

Shegaon Crime : आठवडे बाजाराच्या गर्दीत गाठत युवकाची हत्या; खळबळजनक घटनेने शेगाव हादरले

Box Office Collection : 'थामा' की 'एक दीवाने की दीवानियत' वीकेंडला कोणता चित्रपट हाऊसफुल? वाचा कलेक्शन

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT