SSC Result update :  Saam tv
मुंबई/पुणे

SSC Exam Result 2024 : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी; नागपूरचा निकाल सर्वात कमी

SSC Result update : दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५.८१ टक्के निकाल लागला असून यंदाही कोकण विभागाची बाजी

Vishal Gangurde

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५.८१ टक्के निकाल लागला आहे. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी लागला आहे. मंडळाच्या ९ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च दरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्यातील १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तर्णी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल १.९८ टक्क्यांनी वाढला.

राज्यात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचे ९१.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदा नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला. नागपूरप विभागातील ९४.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाच्या ९ विभागीय मंडळाकडून १ ते २६ मार्च दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली.

दरम्यान, यंदाही काही विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली. राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळाकडून २५,८९४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २५, ३६८ विद्यार्थी प्रत्यक्ष प्ररीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी परीक्षा पास झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल ८०.४२ टक्के इतका लागला आहे.

सर्व विभागीय मंडळाकडून नियमीत मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ही ९७. २१ टक्के इतकी आहे. मुलांची ९४.५६ टक्केवारी इतकी आहे. त्यामुळे यंदाही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५,५८,०२१ विद्यार्थ्यांना ७५ टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

दहावीतील विद्यार्थी https://mahahsscboard.in/mr या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. त्याचबरोबर https://mahresult.nic.in/ आणि msbshse.co.in या वेबसाईटवरही निकाल पाहू शकता. या वेबसाईटच्या आधारे विद्यार्थी स्वत: निकाल पाहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

SCROLL FOR NEXT