मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले असून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. वरळीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राज्यात एक कायमस्वरुपी प्रदेशाध्यक्ष मिळावा, अशी भावना व्यक्त केली जाऊ लागली. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपदासाठी योग्य चेहऱ्याचा शोध घेतला जाऊ लागला. रविंद्र चव्हाण यांच्याकडे अगोदरपासूनच महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्षपद होते. त्यामुळे तेच या पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचं एकमत भाजपने ठरवलं. ठरल्याप्रमाणे त्यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिल्लीला पाठवण्यात आलं होतं. या निवड प्रक्रियेत अन्य कोणत्याही नेत्यानं अर्ज न केल्यामुळे रविंद्र चव्हाण यांची आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
कोण आहेत रविंद्र चव्हाण?
रविंद्र चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय नेते आहेत. सर्वप्रथम २००७ साली ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर २००९ साली विधानसभा निवडणूक लढवून ते आमदार झाले. त्यानंतर २०१४ सालीही त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते आमदार असताना कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे आणि पनवेल महापालिकेत भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं. रविंद्र चव्हाण हे पालघरचे पालकमंत्री राहिलेले आहेत. २०१९ साली रविंद्र चव्हाण हे तिसऱ्यांदा आमदार झाले. २०२१ साली त्यांना मंत्रीपदही देण्यात आलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते मंत्री होते. त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही काम केलेलं आहे. रविंद्र चव्हाण २०२४ साली चौथ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत गेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.