Talathi Recruitment Exam 2023 Saam tv
मुंबई/पुणे

Talathi Recruitment Exam 2023: जालन्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद, सोमवारची तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलण्याची काँग्रेसची मागणी; विद्यार्थ्यांपुढं मोठं आव्हान?

Talathi Recruitment Exam 2023: उद्या राज्यभरामध्ये होणाऱ्या तलाठी भरती परीक्षेवर (Talathi Recruitment Exam 2023) याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Priya More

प्राची कुलकर्णी, पुणे

Jalna Lathi Charge News:

जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर (Maratha Protester) पोलिसांनी (Jalna Police) केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरामध्ये उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनं, निदर्शने आणि बंद पुकारण्यात येत आहे. जालन्याच्या या घटनेप्रकरणी उद्या म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी विविध संघटनांनी राज्यभरात बंद पुकारला आहे.

यामुळे उद्या राज्यभरामध्ये होणाऱ्या तलाठी भरती परीक्षेवर (Talathi Recruitment Exam 2023) याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार (Congress Leader Vijay Waddetiwar) यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांकडून अशाच प्रकारची मागणी होत आहे.

काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी उद्या राज्यात होणारी तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी मुख्य सचिवांसोबत याबाबत चर्चा केली आहे. जालना मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांसवर लाठीचार्ज झाल्यानंतर उद्या राज्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. परीक्षार्थीना त्रास होऊ नये म्हणून परीक्षा पुढे ढकलण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे सदस्य महेश घरबुडे यांनी सांगितले की, 'जालन्यामध्ये झालेल्या घटनेमुळे उद्या तलाठी भरतीची परीक्षा होईल की नाही असा संभ्रम होता. उद्या राज्यातील अनेक मोठ मोठी शहरं बंद आहेत. त्यामुळे आमची अशी मागणी होती की महसूल विभागाने उद्या होणारी तलाठी भरतीची परीक्षा पुढे ढकलावी. पण उद्या तलाठी भरतीची परीक्षा होणार आहे. राज्यात सर्वत्र ही परीक्षा होत आहे.

दोन दिवसांपासून बस व्यवस्था बंद आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दूरचे परीक्षा केंद्र आल्यामुळे अडथळे निर्माण झाले आहे. काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले आहेत. तर काही अद्यापही परीक्षा केंद्रावर पोहचले नाही. आम्ही विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचा.'

तसंच, 'ज्या विद्यार्थ्यांना दूरचे परीक्षा केंद्र आले आहे. त्यांना बस नाही आणि वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचू शकणार नाहीत. ते परीक्षेला मुकणार आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी सरकारने आणि महसूल विभागाने उपलब्ध करून द्यावी. कारण ही अचानक उद्भवलेली परिस्थिती आहे. राज्यामध्ये या घटनेचे प्रचंड पडसाद उमटत असताना यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये. त्यामुळे जे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचू शकणार नाहीत त्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात यावी.', अशी विनंती त्यांनी केली आहे.

दरम्यान, या परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींच्या मोबाईलवर मॅसेज आले आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, 'जालना येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या ४ ऑगस्ट रोजी ठिकठिकाणी बंद आहे. राज्यात उद्या सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहावे. उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपण परीक्षा केंद्रावर येण्याबाबत आपल्या स्तरावर नियोजन करुन परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहाल याची दक्षता घ्यावी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT