Aditya Thackeray
Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, आदित्य ठाकरेंची टीका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. अधिवेश सुरु होण्याआधी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली.

आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, पोलीस तुमच्या हातात आहे. तरीही तुम्हाला भीती एवढी कशाची आहे? मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. इतका पोलीस बंदोबस्त कसाबच्या वेळी देखील लावण्यात आला नव्हता. बसमधून आणलेल्या आमदारांचं मला वाईट वाटतं, कसाबलाही असं आणलं नसेल. कोण पळणार आहे की कोण काय करणार आहे? अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचंच व्हीप अधिकृत आहे असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

हे देखील पाहा -

शिवसेनाच व्हीपच अधिकृत आहे. तोच मानावा लागेल. ही नैतिकतेची टेस्ट आहे. हा विश्वासघात आहे की आणखी काय? असा सवाल त्यांनी केला. आरेचा निदर्शनाला मी जाऊ शकलो नाही. आम्हाला धोका दिलात तर चालेल पण मुंबईकरांना देऊ नका. असे आवाहन आदित्य ठकरे यांनी केले आहे. विधानभवनातील शिवसेना विधानभवन कार्यालय आम्हीच सील केलं आहे. त्याची चावी आमच्याकडेच आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

तर पुढे भाजपवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे सर्व आमदार मित्र पक्ष आहे आज त्यांच्यासोबतच बसायचे आहे. आम्ही एक कुटुंब आहोत. स्पीकर इलेक्शनमध्ये एक शिवसैनिक आणि दुसरा माजी शिवसैनिक आहे. त्यात भाजपला काय मिळालं?, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: सांगलीत अंकलखोपमधील मतदान यंत्रात बिघाड

Inflation Fall In Pakistan: महागाईने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; १ कप चहासाठी नागरिकांची वणवण

Kanakalatha Dies : प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रदीर्घ आजाराने निधन; २५० हून अधिक चित्रपटांत केले होते काम

Dance Effect on Health : मनसोक्त नाचा! डान्स करण्याचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Top Vegetarian Country: जगातील शाकाहारी लोकांची टक्केवारी आली समोर ; भारताचा क्रमांक कितवा?

SCROLL FOR NEXT