Leopard Attack  Saam tv
मुंबई/पुणे

Leopard Attack : राज्यातील बिबट्यांना 1 कोटीच्या बकऱ्यांची मेजवानी; आमदारांना भटक्या कुत्र्यांची भीती, VIDEO

leopard attack : बिबट्या आणि कुत्र्यांच्या हल्ल्याच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशन चांगलचं तापलंय... अशातच बिबट्यांना खाण्यासाठी 1 कोटींच्या बकऱ्यांची मेजवानी देण्याचं विधान वनमंत्र्यांनी अधिवेशानत केलयं... मात्र बिबट्या आणि कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात कसं घमासान वाद पेटला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Snehil Shivaji

राज्यातील ग्रामीण भागात बिबट्यांची आणि शहरातील रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची सध्या दहशत असल्याचं राज्यातील आमदारांनी हिवाळी अधिवेशनात मान्य केलंय.. त्यामुळेच बिबट्या, माणसाला सोड आणि मटण खा असंच काहीसं म्हणण्याची वेळ सध्या सरकारवर आल्याचं दिसतंय. त्याला कारणही अगदी तसंच आहे. राज्यात वाढलेल्या बिबटया- मानव संघर्षावर तोडगा काढण्यासाठी बिबट्यांच्या नसबंदीचा वेळखाऊ प्रस्ताव मांडल्यानंतरही बिबट्याचे हल्ले राज्यभरात सुरु आहेत आणि म्हणूनच आता सरकारनं बिबट्यांसाठी मटण पार्टीचं आयोजन केलंय. वनमंत्री गणेश नाईकांनी बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी काय नियोजन केलंय. ऐका

भुकेल्या बिबट्यांसाठी 1 कोटीच्या बकऱ्या सोडून काय साधलं जाणारय... कारण एकीकडे बिबट्यांच्या नसबंदीची घोषणा होऊनही त्याचा सकारात्मक परिणाम नाही तर दुसरीकडे याच हिंस्र बिबट्यांना खाद्य दिल तरी ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासात किती काळ राहतील हा प्रश्न आहेच.

एकीकडे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यावर तोडगा निघत नसतांना आता राज्यातील आमदारांनी बिबट्यासोबतच भटक्या कुत्र्यांवरुनही सभागृह दणाणून सोडलंय.

एकीकडे राज्यात भटक्या बिबट्यांमुळे भीती आहे तर दुसरीकडे जनतेसोबतच आमदारांना भटक्या कुत्र्यांचंही भय आहे. त्यामुळे आता सरकारने बेसुमार वाढलेल्या बिबट्याची भूक जाणून 1 कोटी बकऱ्यांची बळी चढवण्याचा घेतलेला निर्णय हा किती परिणामकारक ठरतो हे पाहणं महत्वाचं तर आहेच मात्र शहरातील कुत्र्यांचा हल्ले सरकार कसे रोखणार? की जनतेलाच सरकार बिबटे-कुत्र्यांच्या बंदोबस्ताचं आणखीनं एक नवं लॉलीपोप देणारेय? हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

SCROLL FOR NEXT