Ashish Shelar News Saamtv
मुंबई/पुणे

Ashish Shelar News: 'POP गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका; BMC चे धाडसत्र थांबवा... आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी

Ganapati Festival 2023: घरगुती गणेशमूर्ती 4 फुटांच्या असाव्यात, त्या शाडूमातीच्याच असाव्यात, याची अंमलबजावणी करताना पालिका धाड सत्र सुरू करणार आहे.

Rashmi Puranik

Maharashtra Assembly Monsoon Session: पर्यावरण पुरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा आग्रह धरणे योग्य असले तरी पिओपीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मुर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका, असे म्हणत मुंबई महापालिकेने हिंदू सणात विघ्न आणणारे धाडसत्र थांबावावे, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे. सध्या सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई महापालिकेने (BMC) यावेळी गणेशोत्सवातील मुर्तींबाबत कडक निर्बंध घातले आहेत. घरगुती गणेशमूर्ती 4 फुटांच्या असाव्यात, त्या शाडूमातीच्याच असाव्यात, याची अंमलबजावणी करताना पालिका धाड सत्र सुरू करणार आहे. आज याबाबत विधानसभेत आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले आशिष शेलार?

"मुर्ती पर्यावरणपुरक असावी हा आग्रह धरायला हरकत नाही. म्हणून एकाकी पिओपीच्या मुर्ती बनविणाऱ्यांंच्या पोटावर पाय देऊ नये. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. तसेच मुर्तीकारांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. याबाबत निर्णय येणे बाकी असताना मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारु नये.." असे आशिष शेलार म्हणाले.

तसेच याबद्दल पुढे बोलताना "या व्यवसायावर हजारो जणांचे पोट अवलंबून आहे. हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायात होते. त्यामुळे एकाकी त्यावर निर्बंध आणले तर मराठी व्यवसायीक उध्वस्त होतील. हा हिंदूचा सण आहे. धाडसत्र, मुर्ती जप्त करणे अशी विघ्न पालिकेने आणू नये," अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

SCROLL FOR NEXT