तबरेज शेख
नाशिक : नामांकित ॲपल कंपनीच्या मोबाइलचे बनावट साहित्य आणि वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकण्यात (Nashik) आला. या दुकानातून बनावट साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच विक्रेत्यावर (Police) गुन्हा दाखल केला आहे. (tajya Batmya)
बाजारात विविध कंपन्यांचे माेबाईल विक्रीला आहेत. या माेबाईल कंपन्यांकडून त्याचे ओरिजल पार्ट देखील बाजारात आहेत. परंतु कमी किमतीत बनावट साहित्य विक्री केली जात असते. अशाच अँपल कंपनीच्या मोबाइलचे बनावट साहित्य नाशिक शहराचे विक्रीला होते. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी छापा टाकला आहे. पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू झाली.
पाच लाखाचे बनावट साहित्य जप्त
नाशिक शहरातील एमजी रोडवरील मोबाइलचे साहित्य विक्री हाेत असल्याची माहिती पाोलिसांना मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे विक्री करणाऱ्या दुकानांवर मोबाईल कंपनीचे अधिकृत अधिकारी आणि गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अचानक छापे टाकले. यात पाच लाखांच्या बनावट वस्तू जप्त करत विक्रेत्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीच्या अधिकृत प्रतिधिनींच्या तक्रारीनुसार, कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.