Tapi River Flood : तापी नदीला पुर; नंदूरबार जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

तापी नदीला पुर; नंदूरबार जिल्ह्यातील नदी काठावरील गवांना सतर्कतेचा इशारा
Tapi River Flood
Tapi River FloodSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : हतनुर धरण पानलोट क्षेत्रात काल पाउस झाल्याने हतनुर धरणाचे दरवाजे उघडले आहेत. यामुळे तापी नदीला (Tapi River) पुर आला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता तापी नदी कठावरील गावातील नागरीकांना सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Tapi River Flood
Hatnur Dam Water : हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

तापी नदीवरील हतनूर धरणाचे (Hatnur Dam) 41 व्दार पूर्ण क्षमतेने उघडून एकूण 156657 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. तरी संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील सांरगखेडा बॅरेज (sarangkheda Barrage) मध्यम प्रकल्पाचे 2 व्दार पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. यातून एकूण 37735 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. यासोबतच प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून एकूण 41709 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

Tapi River Flood
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच, सिन्नरजवळ भरधाव कारला अपघात; दोघांचा मृत्यू

पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता प्रकाशा आणि सारंगखेडा प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात येवू शकतो. तापी नदी काठावरील गावांतील नागरीकांनी नदीपात्रामध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये, अथवा कोणीही तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये. नदीतील पंप सुरक्षित ठिकाणी स्थळी हलविण्यात यावे. याबाबत नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com