CM Eknath Shinde On Maharashtra Assembly Election Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde Exclusive : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट की विधानसभा निवडणुका वेळेत होणार? काय म्हणाले CM शिंदे?

CM Eknath Shinde On Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार? याच प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दिलं आहे.

Satish Kengar

जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) आणि हरियाणा (Haryana) राज्याच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. यातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचेच उत्तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी साम टीव्हीला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.

यावेळी त्यांना साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रम 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये प्रश्न विचारण्यात आला की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार की विधानसभा निवडणुका वेळेत होणार का? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''निवडणुका वेळेवर होतील.''

'राज्यात महायुतीचं सरकार आणण्याचं उद्दिष्ट'

महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा कोणीही चेहरा नाही. ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल, असा स्वर महायुतीतून येतोय. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, ''आम्ही तुम म्हणून काम करत आहोत, आमचं टीम वर्क आहे. राज्याचा विकास, लोकांना न्याय, हे आमचे काम आहे. कामाची पोचपावती लोक देतीलच.''

शिंदे म्हणाले, ''दिल्लीच्या (Delhi) गल्ली गल्लीत मला चेहरा करा, ''असे बोलणारे आहेत. आम्ही जादू नाही काम करत. २४/७ काम करतो. १० वर्षात एक दिवस पण सुट्टी घेतली नाही.'' ते म्हणाले, ''जगात अर्थव्यवस्था डगमगली. पण आपली ११ वरून ५ वर आली, आता ३ वर आणणार. काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर थाप देण्याचे काम वरिष्ठ करतात. त्यात पोट दुखायला नको.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT