Parvati Assembly Constituency  Saam tv
मुंबई/पुणे

Parvati Assembly Constituency : अगदी सेम टू सेम! पुण्यातील पर्वती विधानसभेत 'रायगड पॅटर्न', एकाच नावाचे तीन उमेदवार

Parvati Assembly Constituency news : पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकाच नावाचे तीन उमेदवार असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावण्यास सुरुवात केली आहे. काहींनी निवडणुकीत उमेदवारांना पाडण्यासाठी आणि त्यांच्या मतांचं विभाजन करण्यासाठी डाव आखण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील पर्वती विधानसभेतही असाच प्रकार पाहायला मिळत आहे. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे थेट तीन उमेदवार पाहायला मिळाले. पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील या रायगड पॅटर्नची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता २२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यातील २० जणांचे उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत, अशी माहिती पर्वती निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आजपर्यंत आलेल्या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात आली. या उमेदवारांना ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

पर्वती विधानसभा अंतर्गत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीन उमेदवार एकाच नावाने समोर आल्याचे उमेदवारी अर्जातील यादीनुसार दिसून आले. एकाच नावाचे तीन उमेदवार निवडणूकीला सामोरे जात असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी अशी समोरासमोर लढत असताना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या नावाला साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अश्विनी नितीन कदम नावाच्या दोन उमेदवार एक महाविकास आघाडी आणि एक अपक्ष अश्विनी अनिल कदम नावाने एक अपक्ष अशा तीन उमेदवार आहेत.

एकाच मतदारसंघात नाव साध्यर्म असणारे उमेदवार असल्याने मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान रायगड विधानसभा मतदारसंघातही असाच प्रकार दिसला होता. रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayonnaise Ban: मोमोज खाऊन महिलेचा मृत्यू; सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; मेयोनीजवर बंदी

Maharashtra Politics: बंडखोरांचे बंड शमवण्यात महायुतीला यश येणार का? मुख्यमंत्री- स्वत: साधणार संवाद

Viral Video: अर्रर्र...! रेल्वेरुळावरचं उभं राहून तरुणीचा भलताच स्टंट; रील VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

PM Mudra Scheme: दिवाळीत व्यवसाय सुरु करायचाय? सरकार देतंय २० लाखांपर्यंत लोन; कसं ते घ्या जाणून

Shukra Gochar: दिवाळीनंतर शुक्र बदलणार रास; 'या' राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

SCROLL FOR NEXT