Maharashtra Politics Saam tv
मुंबई/पुणे

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

pune political News : पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडासाफ झालाय. जिल्ह्यातील एकही काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला नाहीये. जिल्ह्यातील तिनही विद्यमान आमदारांचा पराभव झालाय. पाहूया एक रिपोर्ट

Tanmay Tillu

पुणे : एके काळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि पुरोगामी विचारांना साथ देणारा म्हणून ओळखला जाणारा पश्चिम महाराष्ट्राचा टापू महायुतीने या निवडणुकीत अक्षरश: काबीज केलाय.. हिंदुत्वाचा मुद्दा इथं चालल्याचं दिसलं. पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडासाफ झालाय.

पुण्यातील तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव झालाय.. पुणे जिल्ह्यात महायुती सुसाट सुटली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात रविंद्र धंगेकर, पुरंदर विधानसभेत संजय जगताप आणि भोर विधानसभा मतदारसंघामध्ये संग्राम थोपटे यांचा पराभव झाला आहे. भोर तालुक्यात थोपटेंच्या बालेकिल्ल्याला अजित पवारांनी सुरुंग लावलाय.

पुणे जिल्ह्यात कोणाला किती जागा? -

भाजप - 9

शिंदे सेना (शिंदे)- 1

राष्ट्रवादी (AP) - 8

राष्ट्रवादी (SP) - 1

ठाकरे सेना - 1

अपक्ष - 1

भाजपने कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला,आणि कसबा पेठ या जागांवर विजय मिळवला.

कसबा

हेमंत रासने भाजप- विजयी

रवींद्र धंगेकर काँगेस - पराभूत

पुणे कॅन्टोन्मेंट

सुनील कांबळे, भाजप - विजयी

रमेश बागवे, काँगेस - पराभूत

शिवाजीनगर

सिद्धार्थ शिरोळे, भाजप - विजयी

दत्ता बहिरट, काँग्रेस - पराभूत

पुरंदर

विजय शिवतारे, शिंदे सेना -विजयी

संजय जगताप, काँग्रेस - पराभूत

भोर

शंकर मांडेकर, राष्ट्रवादी (AP) - विजयी.

संग्राम थोपटे, काँग्रेस - पराभूत.

जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. मुळात, पुण्याच्या राजकारणावर एकेकाळी काँग्रेसचा वरचष्मा होता. शहरातून काँग्रेसची पाटी पुन्हा कोरी झाली. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं पुणे शहर गेले दशकभर भाजपचा बालेकिल्ला म्हणून मिरवू लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Eknath Shinde : राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT