Manoj Jarange Patil  Yandex
मुंबई/पुणे

Manoj Jarange News : विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंची माघार, कुणाचा होणार मोठा फायदा? VIDEO

Manoj Jarange Latest News : मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर सत्ताधारी, विरोधक दोघांची धाकधुक वाढली होती. मात्र आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दिवसभरातल्या या महत्वाच्या घडामोडीवरचा एक रिपोर्ट पाहूया..

Girish Nikam

मुंबई : विधानसभा निवडणुकीतल्या राजकारणाने कळस गाठला आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असताना मोठ्या घडामोडी घडल्या. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण-जरांगे फॅक्टरने सत्ताधारी युतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेला सर्वच पक्षीय नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतलीये. जरांगे कुठल्या मतदारसंघात कोण उमेदवार देणार याची उत्सुकता होती. अंतरवाली सराटीत मंथन आणि इच्छुकांच्या बैठका सुरु असतानाच जरांगेंनी शेवटच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. राज्यभरातल्या सर्व मराठा उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलंय. लढायची नाही तर आता उमेदवार पाडायचा असा निर्धार त्यांनी केलाय.

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दिवशी माघार घेण्याची घोषणा केली. आपल्याला निवडणूक लढायची नाही. एका जातीवर जिंकणं शक्य नाही, असं म्हणत मनोज जरांगे यांनी माघार घेण्याची घोषणा केली. जरांगेंनी घेतलेल्या माघारीवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी जोरदार टीका केली आहे. बारामतीच्या आदेशानंतर जरांगेंनी पळ काढल्याचा आरोप हाकेंनी केला आहे.

'बारामतीच्या आदेशानंतर जरांगेंनी पळ काढला, अशा शब्दात हाकेंनी टीका केली. हाकेंच्या टीकेनंतर, मी हाकेंना मोजत नसल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईटच्या विशेष मुलाखतीत दिलीय.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणावरुन राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं. मराठा-ओबीसींमध्ये दरी निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीवर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. आता निवडणुकीतून जरांगेंनी माघार घेतल्यानं लोकसभेसारखाच मविआला फायदा होणार की आणखी काही सत्तेची नवी गणितं जुळणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल होणार आमदार? पाहा Exit Poll

Pune Crime: पुण्यात नववीत शिकणाऱ्या मुलाचा गळा चिरला, १४ वर्षीय पोराचं धक्कादायक कृत्य

Bhosari Exit Poll : भोसरीचा आमदार कोण? एक्झिट पोलमध्ये भाजपला जोरदार धक्का!

Maharashtra Exit Poll: मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा होणार आमदार? पाहा Exit Poll

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

SCROLL FOR NEXT