Baramati News : अर्ज भरल्यानंतर युगेंद्र पवार यांचं मोठं विधान !
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र यांचा सामना येथे आपले चुलते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होईल. त्यांचा अर्ज भरण्यासाठी स्वतः शरद पवार आले होते. युगेंद्र यांनी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते भावुक झालेले बघायला मिळाले. 'आज माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द राहिलेले नाहीत. ते नेहमी मार्गदर्शक, गुरू राहिले आहेत. आपण लहान असताना रोल मॉडेल, आदर्श म्हणून बघत असतो, माझ्यासाठी नेहमी पवार साहेब माझ्यासाठी रोल मॉडेल आहेत. हा क्षण माझ्या आयुष्यातील मोठा दिवस आहे. मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहील. असं म्हणत त्यांनी ज्या पद्धतीने बारामतीकरांनी ५५ वर्ष शरद पवारांना आशीर्वाद दिला तसा आशीर्वाद मला द्या, असं आवाहन केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.