ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जवळपास प्रत्येक महिलेला मेकअप करायला आवडतं, परंतु दररोज मेकअप केल्याने त्वचा खराब होऊ शकते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ग्लोइंग स्कीनसाठी तुम्ही कोणत्या गोष्टी करु शकता, जाणून घ्या.
दररोज शरीराला आवश्यक पुरेसे पाणी प्या. यामुळे त्वचा हायड्रेटेड होईल.
ग्लोइंग स्कीनसाठी तुमचा डाएट हेल्दी असला पाहिजे. म्हणून दररोजच्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा.
जर तुम्हाला नॅचरली ग्लोइंग स्कीन हवी असेल तर दररोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम करा.
दररोज ८ ते ९ तासांची चांगली झोप घ्या. झोप पूर्ण न झाल्यास त्वचेवर परिणाम होऊ शकतो.
झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप पूर्ण काढा आणि चेहरा स्वच्छ धुवा ,नाहीतर चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.