ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांच्या वाढीसाठी अनेक लोक वेगवेगळे तेल किंवा शॅम्पूचा वापर करतात तरीही केस वाढत नाहीत.
केळीच्या सालीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सारखे पोषक तत्व असतात. जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात.
केसांच्या वाढीसाठी केळीच्या सालीपासून हेअर मास्क कसा बनवायचा, जाणून घ्या.
केळीची साल कापून पाण्यात उकळा. सुमारे १५ मिनिटे पाण्यात उकळत ठेवा.
हे पाणी थंड करा, पाणी कोमट झाल्यावर केस आणि स्कॅल्पवर लावून मसाज करा.
हे पाणी केसांना लावल्यावर ३० मिनिटांपर्यत असेच ठेवा. नंतर शॅम्पूने केस धुवा.
या हेअर मास्कमुळे केस मॉइश्चराइज्ड होतील तसेच केस वाढीसाठी मदत होते.