ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा बॅक्टेरिया, वायरस किंवा पॅरासाइट्स पचनसंस्थेमध्ये पसरतात तेव्हा पोटात इन्फेक्शन होतो. ही समस्या वेळेसोबत वाढू शकते.
घाणेरडे दूषित अन्न, शिळे अन्न, किंवा कमी शिजवलेले मांस, तसेच अस्वच्छ पाणी प्यायल्याने पोटात इन्फेक्शन होऊ शकतो. याची लक्षणे कोणती, जाणून घ्या.
पोटाच्या इन्फेक्शनचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अतिसार. त्यामुळे शरीरातील पाणी आणि मीठ कमी होते, म्हणून अशावेळी पाणी किंवा ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ORS) घेणे महत्वाचे आहे.
जेव्हा पोटात इन्फेक्शन होतो तेव्हा पचनसंस्थेवर परिणाम होतो, ज्यामुळे उलट्या होऊ शकतात.
इन्फेक्शन असल्यास सतत पोटात दुखणे, पोटाला सूज येणे, पोटात गॅस होणे अशा समस्या होऊ शकतात.
जर पोटात इन्फेक्शन बॅक्टेरिया किंवा वायरसमुळे झाला असेल तर ताप येऊ शकतो.
अतिसार आणि उलट्यांमुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. तसेच चक्कर येणे किंवा थकवा जाणवू शकतो.