Independence Day 2025: राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी वाचा तिरंग्याशी संबंधित खास नियम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तिरंगा

भारताचा राष्ट्रीय ध्वज, तिरंगा, हे देशाच्या एकतेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. त्याचा आदर करण्यासाठी, काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

indian flag | yandex

फ्लॅग कोड ऑफ इंडिया

तिरंग्याच्या वापरासाठी आणि प्रदर्शनासाठी फ्लॅग कोड ऑफ इंडिया २००२ मध्ये नियम बनवण्यात आले आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते.

indian flag | yandex

तिरंगा फडकावणे

तिरंग्याचा भगवा रंग नेहमी वर असावा आणि हिरवा रंग खाली असावा. तो उलटा फडकवणे हा ध्वजाचा अपमान आहे.

indian flag | yandex

फाटलेला ध्वज फडकावू नये

कोणत्याही परिस्थितीत फाटलेला ध्वज फडकावू नये. असा ध्वज कचऱ्यात न फेकता आदरपूर्वक नष्ट करावा.

indian flag | yandex

जमिनीवर ठेवू नका

तिरंगा जमिनीवर ठेवू नये किंवा पाण्यात बुडवू नये. तो नेहमी उंच आणि आदरणीय ठिकाणी ठेवावा. तसेच तिरंगा असलेले कपडे किंवा पडदे सजावट म्हणून वापरू नये. हा ध्वजाचा अपमान मानला जातो.

India Flag | google

इतर ध्वजांपेक्षा उंच असावा

तिरंगा नेहमी इतर ध्वजांपेक्षा उंच फडकवला पाहिजे. तो इतर कोणत्याही ध्वजाखाली ठेवू नये, तसेच. योग्य प्रकाश नसल्यास तिरंगा सूर्यास्तानंतर उतरवावा.

indian flag | google

वैयक्तिक वापरावर बंदी

राष्ट्रीय ध्वज कार, टेबल किंवा वैयक्तिक वस्तूंवर सजावट म्हणून वापरू नये.

indian flag | freepik

NEXT: ३० दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

sugar | yandex
येथे क्लिक करा