पुणे : राज्यात महायुतीसाठी भाजप आणि वरिष्ठ नेत्यांचा प्रचारसभांचा धुरळा उडवला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलीच कंबर कसली आहे. एकीकडे अमित शहा यांनी राज्यातील काही भागात सभांचा घडाका लावला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सभा घेण्यात येत आहे. आज पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा होती. या पुण्यातील सभेत पंतप्रधान त्यांच्या स्वत:चा आईचा फोटो पाहून भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना नमन करतो. अष्टविनायकाला नमन करतो.
मी पुण्यातील लाडक्या बहीणी आणि लाडक्या भावांना नमक करतो.
मी पाहतोय कोणी सज्जन माझ्या आईची प्रतिमा घेऊन आले आहेत. तुमचे हे प्रेम माझ्यासाठी मोठी ठेव आहे. कोणीतरी ती प्रतिमा घ्या. त्यावर तुमचं नाव पत्ता लिहा. मी तुम्हाला पत्र लिहणार आहे. पूर्ण रस्ताने मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार येईल. तुमचे प्रेम हे सांगत आहे.
मी तुम्हाला विश्वास देतो की महायुतीचं नवीन सरकार आणखी वेगानं पुण्याच्या विकासासाठी काम करेल.
पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू पुण्यात मेट्रोचा सातत्याने विस्तार होत आहे. स्वारगेट- कात्रज सेक्शनमध्ये मेट्रोचं काम वेगाने पुढं जात आहे. इन्ट्रासिटी आणि इंटरसिटी कनेक्टिविटीसाठी प्रयत्न करत आहेत.
आज कार्तिकी एकादशी आहे. आम्ही पालखी मार्ग केले आहेत. ही आमची वारकऱ्यांसाठी समर्पित सेवा आहे.
आधीच्या आघाडी सरकारकडे तुम्हाला सांगण्यासारखे काही नाही. त्यांचे अडीच वर्ष आमच्यावर आरोप करण्यातच गेले.
महायुती आहे, तर महाराष्ट्रात विकासाला गती आहे. कर्नाटकात काँग्रेसने खूप आश्वासन दिले. पण सरकार आल्यावर हात वर केले. उलट जनतेकडून वसुली सुरु केली.
कर्नाटकात काँग्रेसचे रोज नवे घोटाळे पुढे येत आहे. कर्नाटकचे हेच पैसे महाराष्ट्रात निवडणुकीसाठी पाठवले आहेत, असा आरोप आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.