Marathi Language Victory Rally Saam Tv News
मुंबई/पुणे

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Marathi Language Victory Rally : हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्याने ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याचं आयोजन केलंय... पक्षीय जोडे बाजूला ठेऊन मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय. मात्र या मेळाव्याला महाविकास आघाडीतील पक्ष येणार का? ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडी एकत्र येणार की फुटणार? पाहूयात....

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येताय... हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांविरोधात सर्वच विरोधकांनी एकत्रित एल्गार पुकारलाय मराठीसाठी अनेक संघटनाही रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे ठाकरेंच्या मेळाव्यात मराठीसाठी झटणाऱ्या संघटनांसह विरोधीपक्षही सहभागी होईल, अशी आशा होती. मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते या विजयी मेळाव्यात सहभागी होणार का बाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून मविआत फुटी पडलीय का? असा सवाल उपस्थित केला जातोय...तर दुसरीकडे राऊतांनी मात्र जे येतील त्यांचं योगदान आम्ही मराठीसाठी मान्य करू अशी प्रतिक्रिया दिलीय...

दरम्यान, काँग्रेसनं या आधीच राज ठाकरेंच्या भुमिकेला उघड विरोध करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. खरंतर विधानसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्यानंतर ठाकरे ब्रँड जपण्यासाठी ठाकरे बंधूं युती करतील, अशी शक्यता आहे. मात्र ठाकरे बंधूंची एकी काँग्रेसला अस्वस्थ करू लागलीय...यामागे नेमकी कारण काय? पाहूयात...

ठाकरेच्या मेळाव्याकडे मविआची पाठ ?

राज ठाकरेंच्या मविआतील सहभागाने उत्तर भारतीय दुरावण्याची भीती

मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादी भुमिकेमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता

राज ठाकरेंसोबत युती झाल्यास मुस्लीम मतदार फारकत घेण्याची भीती

मविआतील मनसेच्या सहभागाने जागा वाटपावर परिणाम होण्याची शक्यता

तब्बल 19 वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. त्यामुळे ठाकरेंचा या विजयी मेळाव्याकडे महाविकास आघाडीतील घटकपक्षांचं लक्ष लागलयं. या मेळाव्यात ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली तर मविआचं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT