Uddhav Thackeray On MVA CM Face Saam Tv
मुंबई/पुणे

MVA CM Face: मविआत मुख्यमंत्रिपदावरून तिढा; सीएमपदाचा उमेदवार जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची जाहीर मागणी

Uddhav Thackeray On MVA CM Face: महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून तिढा निर्माण झालाय. पहिल्याच संयुक्त मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सीएमपदाचा चेहरा जाहीर करण्यात उघडपणे मागणी केल्यामुळे मविआत सारंकाही आलबेल नसल्याचं पुढं आलंय.

Vinod Patil

मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ? यावरून मविआत तिढा दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसतंय. आतापर्यंत दुस-या फळीतले नेते यावर भाष्य करून एकमेकांवर कुरघोडी करत होते. मात्र मविआच्या पहिल्या संयुक्त पदाधिकारी मेळाव्यात थेट उद्धव ठाकरेंनीच जाहीरपणे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केलीय.

एवढंच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असला तरी आपण त्याला पाठिंबा देऊ मात्र उमेदवार जाहीर कराच, अशी ठाम भूमिका ठाकरेंनी घेतलीय. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चांगलीच अडचण झालीय. तर नेतेच याबाबत काय तो निर्णय घेतील, असं सांगत काँग्रेसनं मेळाव्यात या मुद्यावर सावध भूमिका घेतलीय. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर कराच.'

सीएमपदाचा उमेदवार कोण?

ज्याच्या जास्त जागा जिंकून येतील त्याचा मुख्यमंत्री असं काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते वारंवार सांगत आहेत. मात्र हे धोरणच उद्धव ठाकरेंना मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कारण जास्त जागा निवडून आणण्याच्या नादात मित्र पक्ष एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठीच काम करतात, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. एवढंच नव्हे तर त्यांनी हे सांगताना भाजप-शिवसेना युतीतला या पाडापाडीचा अनुभवही जाहीररित्या सांगितला.

ठाकरेंची मागणी मान्य होणार?

विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी मविआनं आपल्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा घेतला. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा जाहीर करण्याची ठाकरेंनी उघडपणे मागणी केल्यामुळे मविआ कार्यकर्त्यांमध्ये एकोपा निर्माण होण्याऐवजी वाद निर्माण होऊन डोकेदुखी तर वाढणार नाही ना, हेच मविआला टेंशन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT