Rajan salvi  saam tv
मुंबई/पुणे

'...तर बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार'; शिवसेना आमदार राजन साळवींचा इशारा

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

मुंबई : एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळून नवं सरकार आलं आहे. त्यानंतर विधीमंडळात नवीन बदल होत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं, ते लवकरंच भरलं जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून उमदेवार जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित केलं आहे. शिवसेनेने (Shivsena) उमेदवार निश्चित केल्यानंतर व्हिप जारी केला आहे, त्यामुळे बंडखोर आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. ( Maharashtra Assembly Speaker Election 2022 News In Marathi)

राजन साळवी हे शिवसेनेचे राजापूर मतदारसंघाचे आमदार आहे. दरम्यान, भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी काल अर्ज दाखल केला. यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर विरुद्ध राजवी साळवी असा सामना होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक उद्या ३ जुलै रोजी होणार आहे. महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साळवी म्हणाले,'महाविकास आघाडीतर्फे विधानसभा अध्यक्षपदासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मला विश्वास आहे की, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार मला मतदान करतील आणि विजय आमचाच होईल. शिवसेनेने व्हिप बजावला असून बंडखोर आमदारांनी जर मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल,असा इशारा आमदार व महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांनी केला आहे.

दरम्यान, दुसरीकडे विधानसभा विधानसभा अध्यक्षपदाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपलं मत मांडलं. महाविकास आघाडीकडून अजून दोनं अर्ज दाखल केले जातील आणि अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत विचार करून अर्ज मागे घेतले जातील, असं नाना पटोले म्हणाले आहेत. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हेदखील अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT