former minister balasaheb thorat saam tv
मुंबई/पुणे

Nagar Water Distribution Issue : कोणतेही सरकार नसताना अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाचे सूत्र ठरवले, 'समन्यायी'वर फेर विचार व्हावा : बाळासाहेब थाेरात

जायकवाडी धरणात पाणी साेडले जाऊ नये अशी मागणी नगर, नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांची आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Sangamner News :

समन्यायी पाणी वाटप कायद्याचा फेरविचार व्हावा असे मत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले आहे. तत्व म्हणून समन्यायी पाणी वाटप कायदा करण्यात आला परंतु त्याच्या निकषात अनेक दोष असल्याने नगर आणि नाशिक जिल्ह्यावर अन्याय हाेत असल्याचेही थाेरात यांनी नमूद केले. (Maharashtra News)

निळवंडे धरणाचे पाणी वडगावपान परिसरात पोहोचल्याने संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा कृतज्ञता सोहळा आणि भव्य नागरी सत्कार समारंभ ग्रामस्थांकडून आयाेजित करण्यात आला हाेता. त्यावेळी भाषणात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांच्यावर विविध विकासकामांच्या मुद्यावरुन टिका केली.

थाेरात म्हणाले संगमनेर तालुक्यातील कामे बंद पाडण्याचा महसूल खात्याचा प्रयत्न सुरु असताे. मी कुणाचं वाईट केलं असं एक उदाहरण दाखवून द्या असेही थाेरात यांनी म्हटले. टंचाई सदृश्य परिस्थिती जाहीर करताना काही निकष असतात. मात्र प्रथम यादीत फारच गफलत दिसते. मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालायला सांगितले आहे असेही थाेरात यांनी नमूद केले.

समन्यायी पाणी वाटप कायद्याचा फेरविचार व्हावा

बाळासाहेब थाेरात पुढं बाेलताना म्हणाले २००५ साली सरकारमध्ये असताना तत्व म्हणून समन्यायीचा कायदा मान्य केला. मात्र त्याच सूत्र आमच्या काळात ठरवले गेले नाही. कोणतंही सरकार नसताना अधिकाऱ्यांनी पाणी वाटपाचे सूत्र ठरवले असेही थाेरातांनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले तत्व म्हणून समन्यायी पाणी वाटप कायदा (equitable water distribution law maharashtra) करण्यात आला. त्याच्या निकषात अनेक दोष आहेत. त्यामुळे नगर - नाशिकवर अन्याय हाेत आहे. एका भागाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय याला समन्याय म्हणत नाहीत. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याचा फेरविचार व्हावा अशी मागणी थाेरातांनी सरकारकडे केली आहे.

जायकवाडी धरणात पाणी साेडले जाऊ नये यासाठी नगर, नाशिक जिल्ह्यातील काही शेतकरी उच्च न्यायालयात, सर्वाेच्च न्यायालयात गेले आहेत. माजी मंत्री थाेरात यांनी पाणी वाटपाबाबत केलेल्या मागणीचा विचार राज्य सरकार करणार का हे पाहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT