KDMC councillor Madhur Mhatre faces a crucial disqualification hearing amid political controversy over party switch. saam tv
मुंबई/पुणे

शिंदेसेनेच्या नगरसेवकाचे पद रद्द होणार? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष, राजकीय हालचालींना वेग

KDMC Councillor Madhur Mhatre Disqualification Hearing Details: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर १ जून रोजी सुनावणी होणार असून, पक्षांतर प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवक मधुर उमेश म्हात्रे यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर राज्य सरकारकडून १ जून रोजी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक गटनेते उमेश धोंडू बोरगांवकर यांनी जिल्हाप्रमुख शरद शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये मधुर म्हात्रे हे कल्याणडोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आले होते. मात्र, त्यांनी १६ मार्च २०२६ रोजी मूळ पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता शिवसेना शिंदेसेना पक्षात प्रवेश केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

तसेच महापालिकेच्या महासभेत ते मूळ पक्षाच्या आसनावर न बसता दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांच्या आसनावर बसत असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम ३(१)(अ) नुसार त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणी यापूर्वी २५ मे रोजी सुनावणीची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव सुनावणीचे ठिकाण आणि वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता ही सुनावणी १ जून रोजी दुपारी १२.३० वाजता मुंबईतील जुने सचिवालय, एम. जी. रोड, काला घोडा, फोर्ट येथे होणार आहे.

संबंधित नगरसेवक मधुर म्हात्रे तसेच याचिकाकर्ते उमेश बोरगांवकर आणि शरद पाटील यांना सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, या सुनावणीकडे कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनावणीनंतर या प्रकरणात कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT