Madha lok sabha
Madha lok sabha  Saam tv
मुंबई/पुणे

Madha lok sabha : माढ्यात मोठा ट्विस्ट; उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चेनंतर काय म्हणाले?

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

पुणे : देशासहित राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अनेक नेते नाराजी देखील व्यक्त करताना दिसत आहे. या नाराज इच्छुक उमेदवारांनी इतरत्र चाचपणी देखील करायला सुरुवात केली आहे. अशीच परिस्थिती देशभरात पाहायला मिळत आहे. माढा लोकसभेतही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. माढ्यातील उत्तम जानकर यांनी नुकतीच पुण्यात शरद पवारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर उत्तम जानकर यांनी १९ तारखेला अंतिम निर्णय होईल, असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

पुण्यात शरद पवारांची भेट झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. उत्तम जानकर यावेळी म्हणाले, 'माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची बैठक झाली. शरद पवारांची इच्छा होती, की जानकर आणि मोहिते यांनी एकत्र यावं. याबाबत येत्या २, ३ दिवसात दुसरी बैठक होईल. १९ तारखेला माळशिरस आमदारकीबद्दल चर्चा होईल'.

'माढामधील लोकांनी काय कामं केलं पाहिजे, याबद्दल चर्चा झाली. आमच्या तालुक्यातील लोकांची इच्छा आहे की शरद पवारांसोबत जावं. आम्ही एकत्र आलो तर मी माळशिरसचा आमदारकीचा उमेदवार असू शकतो. कार्यकर्त्यांची भावना १९ तारखेला अंतिम होईल. १९ तारखेला अंतिम निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

'कार्यकर्त्यांमध्ये मतमांतर असू शकतं. मी कुठल्याही प्रवेश पक्षात करणार नाही. मी सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे. जरी मी अजित पवार गटात असलो, तरी सुद्धा फडणवीस यांच्या भेटीला गेलो, असे त्यांनी स्पष्ट केले.

धैर्यशील मोहिते काय म्हणाले?

धैर्यशील मोहिते म्हणाले, ' शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं आहे. १९ तारखेला मेळावा होईल आणि त्यातून निर्णय होईल. राजकीय वैर संपायला पाहिजे हीच भूमिका आहे. रामराजे महायुती सोबत आहेत, त्यांचे सर्व कुटुंब आमच्या सोबत आहेत. चांगल्या मताने निवडून येऊ'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: केसांना कंडिशनर लावताना 'या' चूका करू नका; अन्यथा पडेल टक्कल

Vastu Tips: देवघरात माचिक बॉक्स का ठेवू नये, कारण काय?

Today's Marathi News Live : लसणासहित भाजीपाल्याचे दर वाढणार

Navi Mumbai Crime News: २० वर्षीय तरुण आणि २ अल्पवयीन मुलींकडून मॉरेशियन नागरिकाची दगडाने ठेचून हत्या; नवी मुंबईत खळबळ

Water Crisis : लातूरकर चिंतेत, मांजरा धरणात अल्प पाणीसाठा, सोलापुरातील 143 गावांसह 991 वाड्या- वस्त्यांवर 200 टँकर्सने पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT