Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

Threat to Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. चार वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना ही धमकी आल्याचं समजलंय. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.
Eknath Khadse
Eknath Khadse Saam TV

राजकीय वर्तृळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. चार वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना ही धमकी आल्याचं समजलंय.

Eknath Khadse
Navneet Rana Threat News : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तान कनेक्शन आलं समोर

साम टीव्हीशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले की, "पर्वापासून काल रात्रीपर्यंत मला धमकीचे फोन आले आहेत. आम्ही तुम्हाला मारू, तुमचा जीव घेऊ अशी धमकी फोनवरून देण्यात आलीये. सदर नंबर ट्रेस केल्यानंतर एक अमेरिका आणि एक उत्तर प्रदेशातील असल्याचं दिसत आहे."

" याबाबत पोलीस स्टेशला मी तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता या प्रकरणी चौकशी करतायत. तपासात काय समोर येतं ते पाहावं लागेल, असंही एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितलं.

दाऊदच्या पत्नीशी फोनवर संभाषण

अमेरिका आणि लखनऊ येथून हे फोन आलेत. या आधी देखील मला असे धमकीचे फोन आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी दाऊदच्या पत्नीशी फोनवर माझं संभाषण झाल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला होता. मात्र त्यावेळी देखील तपासात एका व्यक्तीने खोडसाळपणा करत एका सॉफ्टवेअरवरून हा फोन कॉल झाल्याचं दाखवलं होतं, हे देखील एकनाथ खडसेंनी यावेळी स्पष्ट केलं.

Eknath Khadse
Mumbai Crime : बर्थडे सेलिब्रेशननंतर टोकाचा वाद; जिने दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या, मित्रानं केला तिच्याच आयुष्याचा शेवट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com