Today's Marathi News Live : वादळामुळे भीमा नदीत बोट उलटली; ५ जण बुडाल्याची माहिती

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (21 may 2024) : लोकसभा निवडणूक, देश-विदेश राज्यातील प्रत्येक घडामोडी, लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
Maharashtra's Live News in Marathi By Saam TV
21 May 2024 Latest Updates PM Narendra Modi, raj thackeray , uddhav thackeray Saam TV

Indapur:  वादळामुळे भीमा नदीत बोट उलटली; ५ जण बुडाल्याची माहिती

उजनी धरण पात्रात सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळ बोट पलटी झाल्याची घटना घडलीय. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशीहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे जाणारी बोट (लांस )पलटी झाली. यामध्ये ५ जण बुडाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. यातून एका जण पोहत-पोहत आल्याने त्याने आपला जीव वाचवलाय.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, कोर्टाने जामीन नाकारला

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच

दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन नाकारला

निवडणूक प्रचारासाठी जामीन मिळावा अशी मागणी सिसोदिया यांनी केली होती त्यावर कोर्टाने आज निकाल दिला

सिसोदिया यांना कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ED ने अटक केली आहे

हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे महामार्गावर विद्युत पोल पडले

हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे महामार्गावर पोल पडला

एकाच दिवसात वादळी वाऱ्याचा जिल्ह्याला दुसऱ्यांदा फटका

दुचाकीस्वारांनी जीव धोक्यात घालून चक्क विद्युत तारावरून केला प्रवास

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के सक्सेना यांची प्रतिक्रिया

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के सक्सेना यांची प्रतिक्रिया

दिल्ली राष्ट्रीय राजधानी आहे, जगभरातून लोक दिल्लीत येतात

अशा घटनांमुेळे जगभरात भारताची प्रतिमा खराब होतेय

स्वाती मालीवाल यांनी मला काल फोन करून घडलेली घटना सविस्तर सांगितली

स्वाती यांच्यासोबत घडलेली घटना लाज आणणारी आहे

शिष्टाचार म्हणून तरी केजरीवाल यावर बोलतील ही अपेक्षा होती मात्र त्यांचं शांत राहान बरच काही सांगून जात

डोंबिवलीत मतदार यादींच्या घोळाप्रकरणी अभिजीत बिचूकले आक्रमक

कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली येथे झालेल्या मतदार याद्यांच्या घोळाबाबत अभिजीत बिचूकले आक्रमक

कल्याण लोकसभा मतदारसंघात फेर निवडणूक घेत मतदान घ्या

अन्यथा 27 तारखेला निवडणूक अधिकाऱ्यांच्याा कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करु

अभिजीत बिचुकलेंचा निवडणूक आयोगाला इशारा

80 हजार मतदारांचे नाव गायब केल्याने 80 हजार मतदार मतदानापासून वंचित

डोंबिवली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत अभिजीत बिचुकलेंनी दिले निवेदन

ममता बॅनर्जी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरण, भाजपच्या उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी बंदी

ममता बॅनर्जी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय यांना निवडणूक प्रचारासाठी बंदी

आज सायंकाळी 5 वाजल्यापासून पुढील 24 तास प्रचारासाठी निवडणूक आयोगाने घातली बंदी

निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेअंतर्गत अशी वक्तव्य करताना सावध राहण्याचा दिला इशारा

15 मे रोजी पश्चिम बंगालच्या हल्दिया येथे जाहीर सभेत केली होती आक्षेपार्ह टिप्पणी

टीएमसीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती

निवडणूक आयोगाने TMC ची दाखल घेत गंगोपाध्याय यांच्यावर कारवाई केली

देवेंद्र फडणवीस पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल

देवेंद्र फडणवीस पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल

२ दिवसांपूर्वी पुण्यात नामांकित बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने आलिशान कारने दोन जणांना चिरडले होते

या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते

त्यानंतर आता अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तालयात हजेरी लावली

पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस अधिकाऱ्यांशी देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू

पुणे हिट अँड रन प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बार केला सील

पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

कोझी बार राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला सील

एक्साइज विभागाचे अधिकारी कारवाईसाठी दाखल

अल्पवयीन आरोपी याच कोझी बारमध्ये दारू प्यायला होता

बीडमध्ये उष्माघाताने भाजी विक्रेत्याचा मृत्यू

बीडमध्ये उष्माघाताने भाजी विक्रेत्याचा मृत्यू

बीड जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला

परळीत उष्माघाताने एकाचा मृत्यू

भाजी विक्रेता महादेव गुट्टे यांचा मृत्यू

भोवळा आल्यानंतर रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी मृत घोषीत केले

लोकसभेच्या निकालाआधी आढळराव कोल्हे समर्थकांची बँनरबाजी..!

शिरुर लोकसभा मतदार संघात आढळराव आणि कोल्हेंच्या विजयाचे निकालाआधीच खासदार पदी निवड झाल्याचे बँनर झळकलेत .

कल्याण डोंबिवलीत मतदार याद्यांमध्ये घोळ; जागरूक नागरिक दाखल करणार रीट  पिटीशन

निवडणूक आणि मतदार याद्यांचा घोळ हे समीकरण गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरू आहे ते या निवडणुकीतही पाहायला मिळालं कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झालीत . कल्याण डोंबिवली मध्ये अनेक ठिकाणी असा प्रकार दिसून आला .कल्याण पश्चिमेकडील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच या प्रकरणी न्यायालयात एक रीट याचिका दाखल केली जाणार आहे.

kyrgyzstan News : किर्गिस्तानमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

किर्गिस्तानमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानी विद्यार्थ्यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट लागला कामाला; सर्व आमदारांची बोलावली बैठक

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट कामाला लागला आहे. २७ तारखेला बोलावली पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. बैठकीत लोकसभा मतदानासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. मुंबईत गरवारे क्लब इथं पक्ष बैठकीचं आयोजन केलं आहे. मित्रपक्षांचं सहकार्य आणि राज्यातल्या मतदानाबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Hingoli News:   हिंगोलीत वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान, झाडे उन्मळून पडली, टिन पत्रे उडाली

हिंगोलीच्या खुडज गावाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे.

अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने खुडज मधील टिन पत्र्याची

घरे,जनावरांची गोठे उडाली

वादळी वाऱ्याने विद्युत रोहित्र झाडे देखील उन्मळून पडली आहेत

पुणे अपघात : पबमालक, व्यवस्थापक अशा तिघांना आज कोर्टात हजर करणार, मुलाच्या वडिलांना उद्या कोर्टात नेणार

पब मालक आणि व्यवस्थापक अशा अटक करण्यात आलेल्या तिघांना आज कोर्टात हजर करणार

⁠मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना उद्या कोर्टात हजर केले जाणार

⁠दुसऱ्या गुन्ह्यातील चौथा आरोपी जयेश बोनकर याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यालाही उद्या कोर्टात हजर करणार

मृतांचे नातेवाईक आणि मित्रांनी वाईट वागणुक देण्याचे, त्यांना धमकावण्याचा प्रकार आमच्या कानावर आला आहे. त्यावर आम्ही चौकशी करत आहोत. मात्र, नातेवाईकांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. नातेवाईकांना वाईट वागणूक आणि आरोपींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन, कठोर कारवाईच्या सूचना

पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन

या प्रकरणात कुणालाही पाठिशी न घालता, राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याने कठोर कारवाई करण्याच्या सूचना

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनांपाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांचीही कडक भूमिका

Nandurbar : अवकाळी पावसानंतर नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर आता नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट

तापमान हे 43 अंश सेल्सिअस वर

वाढलेल्या तापमानामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात रस्त्यांवर शुकशुकाट

तापमानाने गाठलेल्या विक्रमी पातळीच्या सर्वाधिक परिणाम

नंदुरबार जिल्ह्यात आगामी आठ दिवसात उष्णतेची लाट कायम राहणार

देशभरात NIA चे अनेक ठिकाणी छापे

देशभरात NIA चे अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

जवळपास 11 ठिकाणी छापे सुरू आहेत.

रामेश्वरम् कॅफे प्रकरणी हे छापे सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Pune Rain : पुण्यात घोरपडीत परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

सोमवारी घोरपडी परिसरात विजांच्या कडकडासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

पावसासोबत जोरात वारा सुटल्याने जवळपास अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले

झाडे रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकीवर पडून वाहनाचे मोठे नुकसान

kyrgyzstan News : किर्गिस्थानमधील हिंसाचाराचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फटका

किर्गिस्थानमधील हिंसाचाराचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. किर्गिस्तानमध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील ५०० हून अधिक आहेत. सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी 500 पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातून किर्गिस्थानमध्ये आहेत. संभाजीनगर, धाराशिव आणि बीड जिल्हातीलही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा स्थानिक‌ प्रशासनाचा निर्णय घेतला आहे. परीक्षेनंतर जूनमध्ये सर्व विद्यार्थी भारतात परतण्याचा अंदाज आहे.

Sinhagad Fort : सिंहगडाकडे वाहनांसाठी रस्ता बंद

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत (23 मे पर्यंत) दुरुस्तीसाठी बंद

सिंहगड किल्ल्यावर कोणतेही वाहन गुरुवारपर्यंत जाणार नाही

अतकरवाडी मार्गे चालत गडावर जाता येणार

पावसाळ्यात सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर कोसळतात दरडी

महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाला जाहीर झाला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Chandrapur News : रेल्वेच्या धडकेत तीन चितळांचा मृत्यू, चंद्रपुरातील घटना

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या तळोधी गावालगत रेल्वेच्या धडकेत तीन चितळांचा मृत्यू झाला. बल्लारपूर- चांदाफोर्ट ते गोंदिया धावणाऱ्या रेल्वे गाडीच्या धडकेने या चितळांचा मृत्यू ओढवला. या भागात मोठे वन्यजीव क्षेत्र असल्याने अनेकदा रेल्वे ट्रॅकवर वन्यप्राणी मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मृत तीनही चितळांचे शवविच्छेदन करून नजीकच्या सावरगाव येथील वनवाटिकेत दहन करण्यात आले.

Political News : भाजप नेते जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे सुपुत्र जयंत सिन्हा यांना भाजपची कारणे दाखवा नोटीस

पुढच्या 2 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश

भाजपनं हजारीबाग लोकसभा मतदार संघातून जयंत सिन्हा यांचं तिकीट कापलं. त्यानंतर मनीष जैस्वाल यांना तिकीट दिलं होतं.

तिकीट जाहीर केल्यापासून तुम्ही संघटनात्मक काम आणि निवडणूक प्रचारात रस घेतला नाही, तुमच्या वागण्याने पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा पत्रात उल्लेख आहे. यानंतर सिन्हा काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचं आहे.

Bihar Lok Sabha : बिहारमध्ये भाजप आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर सारणमधे हिंसाचार झाला आहे. भाजप आणि RJDच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

गोळीबारात एकाचा मृत्यू,तर दोघे जखमी झाले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

पुढचे दोन दिवस इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

vegetable Price Hike : लसणासहित भाजीपाल्याचे दर वाढणार

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसूण आवक घटल्याने दर वाढले आहेत.

पुण्यात लसूण दर प्रति किलो १६० रुपये झाला आहे.

लसणासहित भाजीपाला दरही वाढण्याची शक्यता

अवकाळी पाऊस आणि पाणी कमी असल्याने लसूण आणि इतर पालेभाज्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे हे दर वाढण्याची शक्यता आहे.

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध

हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जावर ईडीचे सुप्रीम कोर्टात उत्तर

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जावर ईडीचं सुप्रीम कोर्टात उत्तर

निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळावा अशी केली होती सोरेन यांनी मागणी

सोरेन यांच्या याचिकेला ईडीकडून विरोध

झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात जमीन घोटाळ्यात भरपूर पुरावे आहेत - ईडी

Mahadev betting app Case : महादेव बेटिंग अॅप प्रकरण , तीन मुख्य आरोपींना अटक

पुण्याच्या नारायणगाव येथील महादेव बेटिंग अॅप कारवाई

तीन मुख्य आरोपींना मध्यप्रदेशातून अटक

आतापर्यंत 93 जणांना अटक

Ebrahim Raisi : इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इब्राहिम रईसी यांचा अपघाती मृत्यू, केंद्र सरकारकडून १ दिवसाचा राजकीय दुखवटा

आज देशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रईसी आणि इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. यामुळे केंद्र सरकारने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुखवटा जाहीर निर्णय केला. सरकारी कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकवला जातो, तो आज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे.

lok Sabbha Election Voting : देशात पाचव्या टप्प्यात सरासरी 60.09 टक्के मतदान, महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान

देशात पाचव्या टप्प्यात सरासरी 60.09 टक्के मतदान

रात्री 11.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी आयोगाकडून जाहीर-

बिहार - 54.85%

जम्मू काश्मीर - 56.73%

झारखंड - 63.07%

लडाख - 69.62%

महाराष्ट्र - 54.29%

ओडिसा - 67.59%

उत्तर प्रदेश - 57.79%

पश्चिम बंगाल - 74.65%

Thane Railway Station : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील जाहिरात फलकाला आग

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 समोर

जाहिरात फलकाला किरकोळ आग

आग आटोक्यात आली आहे.

फलकामधील वाय रिंगला सदरची आग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com