BMC Innova Crysta vehicle purchase controversy Saam T
मुंबई/पुणे

Mumbai News: स्कॉर्पिओ नको, इनोव्हा हवी! BMC मध्ये महागड्या गाड्यांची उधळपट्टी, वाहन खरेदीवरून राजकारण तापले

BMC Innova Crysta vehicle purchase controversy: मुंबई महानगर पालिकेमध्ये वाहन खरेदीवरून राजकारण चांगलेच तापले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.

Priya More
  • मुंबई महानगर पालिकेत वाहन खरेदीवरून वाद सुरू

  • बीएमसी पदाधिकाऱ्यांसाठी इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची मागणी

  • स्कॉर्पिओ एनमधून प्रवास करताना शारीरिक त्रास होत असल्याचे कारण सांगितले

  • एका इनोव्हा क्रिस्टा गाडीची किंमत सुमारे २५ लाख रुपये असल्याची माहिती

मुंबई महागर पालिकेतील उधळपट्टीचा नवीन प्रकार समोर आलाय. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओऐवजी आता इनोव्हा क्रिस्टा हवीय. कारण काय तर स्कॉर्पिओ एन गाड्यांमधून प्रवास करताना धक्के बसतात, पाठ दुखते. त्यामुळेच या पदाधिकाऱ्यांनी इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची मागणी केली. त्यानुसार उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि ३ समिती अध्यक्षांसाठी २५ लाखांच्या इनोव्हा गाड्या मागवण्यात आल्या आहेत. हा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

मुंबई महानगर पालिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालिकेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी आणखी महागड्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला जात आहे. सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि ३ वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसह विरोधी पक्षनेत्यासाठीही नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महानगर महापालिकेत निवडणुकीनंतर नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची वर्दळ खूपच वाढली आहे. विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांची इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड गाडी देण्यात आली आहे. उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध समिती अध्यक्षांसाठी देखील महागड्या गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी स्कॉर्पिओ एन वाहने देण्यात आली आहेत. पण स्कॉर्पिओ एन वाहन प्रवासासाठी सोयीचे नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली.

महापालिका मुख्यालय ते घर, तसेच पाहणी दौऱ्यांदरम्यान या वाहनातून प्रवास करताना धक्के बसतात. या वाहनाची उंची जास्त असल्याने पाठीचा त्रास वाढतो, अशी अनेक कारण देत इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. सभागृह नेते, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्षांसाठीही इनोव्हा क्रिस्टा गाड्या देण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासाठीही अशाच प्रकारची गाडी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या एका इनोव्हा क्रिस्टा गाडीची किंमत जवळपास २५ लाख रुपये आहे. नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला जर मंजुरी मिळाली तर सध्या या पदाधिकाऱ्यांच्या सेवेत असलेल्या स्कॉर्पिओ गाड्यांचं काय होणार असा प्रश्न आहे.

सभागृह नेते गणेश खणकर यांनी इनोव्हा गाड्याची मागणी करत सांगिकतले की, 'माझ्यासह उपमहापौर ६६ आणि समिती अध्यक्षांना अनेक बैठका, भेटी आणि पाहणी दौरे करावे लागतात. काही पदाधिकारी खूपच लांब राहतात. सध्याच्या स्कॉर्पिओ वाहनातून प्रवास करताना शारीरिक त्रास होतो. त्यामुळे इनोव्हा गाड्यांची मागणी केली जात आहे. विरोधी पक्षनेत्यांनाही अशीच गाडी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर ज्या जुन्या स्कॉर्पिओ गाड्या आहेत त्याय कार्यकारी अभियंत्यांना देण्याचा विचार केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

Chanakya Niti: या ४ ठिकाणी दान केल्याने वाढते श्रीमंती, चाणक्यनितीतले महत्त्वाचे विचार नक्कीच वाचा

SCROLL FOR NEXT