मावळात सत्तर टक्के जनावरांना 'लंपी रोगाची' लागण; बळीराजा चिंतेत दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

मावळात सत्तर टक्के जनावरांना 'लंपी रोगाची' लागण; बळीराजा चिंतेत

राज्यसह मावळात कोरोना ने थैमान घातले होते तो कुठेतरी आटोक्यात येण्याच्या मार्गावर येत आहे.

दिलीप कांबळे

पुणे: मावळात अनेक भागांत लंपी या त्वचारोगाने जनावरे बेजार झाली आहे. अंगावर गाठी येवून फोड येणे फोड फुटल्यावर जखम होणे, ताप येणे, चारा न खाणे त्यामुळे जनावरांची शक्ती कमी होत आहे. मावळ मध्ये बावन्न हजार पशुधन असून सत्तर टक्के जनावरांना हा लंपी रोग झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या आजाराची दहशत आहे.

राज्यसह मावळात कोरोना ने थैमान घातले होते तो कुठेतरी आटोक्यात येण्याच्या मार्गावर येत आहे. तर मावळ मध्ये जनावरांवर लंपी रोगाने प्रहार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जनावरांच्या दूध उत्पादनावर याचा परिणाम होत आहे. त्यातच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे गुरांना उपचार करण्यास विलंब लावत आहे. मावळ मधील दहा गावात एक पशुवैद्यकीय अधिकारी आहे. प्रत्येक गावात पोहोचणे त्यांना अशक्य झालेले आहे त्यातच हा रोग वाढत आहे. लंपी रोग झालेल्या जनावरांना वेगळे बांधावे लागते त्याला वेगळ्या चारा द्यावे लागतील.

विषाणूजन्य रोग असल्याने याचा त्याला रोग होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. अशातच पवन मावळातील काही तरुण शेतकरी पुढे सरसावले आहेत, ते स्वतः या लसीबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम राबवत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कुठं तरी दिलासा मिळत आहे.

मावळात अनेक ठिकाणी लंपी बाबत जनजागृती करून लसीकरण करण्यात आलेले. परंतु लसीकरण होऊनही अनेक जनावरांना हा आजार झाला आहे. हा लंपी रोग अटोक्यात यावे यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावे लागते. गोठ्यात पाणी साचू देऊ नये याची काळजी घ्यावी लागते. मुख्यतः गाई बैल या जनावरांना हा आजार रोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. एखादा जनावर दगावला तर शासना कडून त्वरित शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयांचे अनुदान देणार आहे.

लंपी हा रोग विषाणूजन्य रोग आहे. शेळ्या मेंढ्यांमध्ये जो दिव्यारोग आढळतो त्याचं प्रमाणे हा रोग आहे. कोरोना रोगाला जसे परफेक्ट औषध नाही त्याच प्रमाणे या रोगाला ही औषध नाही. मात्र जनावरांची प्रतिकार शक्ती वाढवण्याची अँटिबायोटिक औषधे दिली तर हा रोग आटोक्यात येऊ शकतो. लंपी आजारापासून संरक्षण बाधित जनावरे वेगळी बांधावीत.प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावारांना गोठ्यात डास, माश्या, गोचीड आदींचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी. देशी वशांच्या जनावरांपेक्षा संकरीत जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे.

लंपी आजाराची लक्षणे

-लंबी हा रोग विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात.

-जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते.

-प्रजनन क्षमतेवरही विपरित परिमाण.

-जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रिय आदी भागात येतात.

-बाधित जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरांना चालताना त्रास होतो.

अगोदरच कोरोनाने शहरी, ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणा ठप्प झाली. तर दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा, अवेळी पडणारा पाऊस त्यामुळे शेतीचं मोठ नुकसान झाले आहे. टाळेबंदीत भाजीपाल्याला दर नाही आणि अत्ता या लंपी रोगाचं संकटात सापडल्यामुळे मावळातील बळीराजा हवालदिल झालाय. या रोगात एखाद जनावर दगावला तर सरकारी अनुदान शेतकऱ्यांचे मिळेल पण लाख मोलाचं जनावर गेलं तर त्याच दुखः फार होत असेल त्यामुळे मायबाप सरकारने या रोगाचं महत्व लक्षात घेऊन या कडे लक्ष देऊन बळीराजाला दिलासा द्यावा हीच एक अपेक्षा मावळ मधील शेतकऱ्यांची आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT