Sharad Pawar Pays Homage To Anil Awachat  Saam Tv
मुंबई/पुणे

हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले; शरद पवारांची अनिल अवचट यांना श्रद्धांजली

अनिल अवचट यांना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट (Anil Awachat) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अनिल अवचट यांना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. (Sharad Pawar Pays Homage To Anil Awachat)

शरद पवार म्हणाले, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरले. शोकाकुल अवचट कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

दरम्यान, मुक्तांगणचे संस्थापक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे थोड्या वेळापूर्वी राहत्या घरी निधन झाले. अवचट यांच्या पायावर चार दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडली त्यानंतर ते कोमामध्ये गेले आणि सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुक्ता आणि यशोदा या दोन मुली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs: नवरा- बायकोच्या नावाचं मंगळसूत्र, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Thyroid Health : तुमचंही वजन विनाकारण वाढतंय? 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो थायरॉईड

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांचे शिष्टमंडळ आणि अधिकाऱ्यांत बैठक सुरू

Global Warming : मुंबई जगाच्या नकाशावरून गायब होणार? UN च्या अहवालात भारताला भयानक इशारा; पुढील काही वर्षांत काय घडणार?

Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT