liquor saam tv
मुंबई/पुणे

Lonavala City Police News : बेकायदेशीर दारु विकणार्‍यांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई, एक लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहे.

दिलीप कांबळे

Lonavala Crime News : लोणावळा (lonavala) शहरात गेल्या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीररित्या देशी आणि विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांवर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. पाेलिसांनी (lonavala city police) दारुसह एक लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Maharashtra News)

या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी भरत लक्ष्मण कदम व गणेश पांडुरंग साळवे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दाेघांकडून दारुसह एक लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटल रोडवर यातील भरत कदम हा त्याच्या कारमधून बेकायदा विक्रीसाठी 24 बियरच्या बाटल्या, देशी दारूच्या 48 बाटल्या, विदेशी दारुच्या 10 बाटल्या घेऊन चालला हाेता. त्याच्याकडे चाैकशी केली असता त्याला समर्पक उत्तर देता आले नाही. त्याला पाेलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.

दुसऱ्या घटनेत गणेश साळवे हा आपल्या काळ्या रंगाची मोटार सायकलवरून विदेशी दारुच्या 21 बाटल्या, देशी दारूच्या 47 बाटल्या, अन्य एका कंपनाच्या दारूच्या 21 बाटल्या बेकायदेशीर विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांना आढळला. त्याला देखील पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT