Abhijeet Bichukle Saam Tv
मुंबई/पुणे

Abhijit Bichukale: कल्याणमध्ये फेर निवडणूक घ्या, अन्यथा आमरण उपोषण; अभिजीत बिचुकलेंचा इशारा

Abhijit Bichukale On Hunger Strike: कल्याण लोकसभा मतदारसंघात फेर निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी बिग बॉस फेम आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Priya More

कल्याण लोकसभा मतदारसंघाकरीता (Kalyan Lok Sabha Constituency) सोमवारी मतदान पार पडले. या मतदार संघातून ८० हजार मतदारांची नावे गायब झाली होती. त्यामुळे ८० हजार मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यंदा ते मतदान करण्यापासून वंचित राहिले. अशामध्ये या लोकसभा मतदारसंघात फेर निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी बिग बॉस फेम आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांची मागणी विचारात घेतली नाही तर येत्या २७ मेपासून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा अभिजीत बिचुकुले यांनी निवडणूक आयोगाला दिला.

अपक्ष उमेदवार बिचुकले यांनी आज कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुष्मा सातपुते यांची भेट घेतली. अभिजीत बिचुकले यांनी त्यांना एक निवेदनही सादर केले. अभिजीत बिचुकले यांनी सांगितले की, 'कल्याण लोकसभा मतदारसंघात कमी टक्के मतदान झाले आहे. काल अनेक बातम्या समोर आल्या की या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये काही तरी गडबड सुरु आहे. मी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहिली त्यांनी सांगितले होते की, निवडणूक आयोगाचे काम थोडेसे मनमानी कारभाराचे आहे. एकनाथ शिंदे हे याठिकाणी मुख्यमंत्री असल्यामुळे संपूर्ण प्रशासन त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे हे त्यांच्या हाताखाली काम करत आहे.'

तसंच, 'मी कल्याण लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार असल्याने या प्रकरणी मी जातीय लक्ष घालून निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले. या ठिकाणी ताबडतोब आयोगाला कळवा की अभिजीत बिचुकले यांची सूचना दिल्या आहेत. या मतदार संघात ८० हजार नावे लुप्त केली असतील तर एका माणसाचे नाव जरी गायब झाले तरी लोकहिताला बाधा येते. हे कामकाज सरकारच्या माध्यमातून प्रेरित आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.', असे बिचुकले यांनी सांगितले.

अभिजीत बिचुकले यांनी पुढे असे सांगितले की, 'मतदानापासून लोकांना तुम्ही वंचित ठेवत असाल तर संपूर्णत: मी प्रथम भारतीय आहे. शेवटही मी भारतीय आहे. भारतीय म्हणून ज्यांचा ज्यांचा मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने लुप्त केला. या सर्व लोकांसाठी ही निवडणूक प्रक्रिया कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये परत घ्या. अन्यथा २७ मे रोजी मी अपक्ष उमेदवार या नात्याने आमारण उपोषण करणार आहे. लोकशाही आणि गांधीवादी मार्गाने मी उपोषण करणार आहे. हे मी माझ्या भारतीयांसाठी करत आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT